Pune Crime News | मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला मारहाण करुन मोबाईल चोरणार्या चौघांना लोणी काळभोर पोलिसांनी केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठ नागरिकाला शिवीगाळ करुन दुखापत करुन जबरदस्तीने त्यांचा मोबाईल चोरुन नेणार्या चौघांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे.
सुजल बाळासाहेब झेंडे Sujal Balasaheb Zende (वय २०, रा. गुरुदत्त कॉलनी, भेकराईनगर, हडपसर), शुभम संजय चव्हाण Shubham Sanjay Chavan (वय २४, रा. गोसावी वस्ती, हडपसर), ओमकार अशोक चिंतलु Omkar Ashok Chintlu (वय २१, रा. आनंदनगर सोसायटी, हडपसर) आणि अभिजित सतिश कांबळे Abhijeet Satish Kamble (वय २०, रा. कदमवाक वस्ती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
फिर्यादी व त्यांचे मित्र ८ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजता फिरायला कदम वाक वस्तीतील रिव्हर व्ह्यु सिटीचे मागील रेल्वे लाईनच्या मोकळ्या जागेत फिरायला गेले होते. त्यावेळी चौघांनी फिर्यादी यांना शिवीगाळ करुन दुखापत केली. त्यांची झडती घेतली. सकाळी फिरायला गेले असल्याने त्यांच्याकडे मोबाईलशिवाय काही नव्हते. चोरट्यांनी जबरदस्तीने मोबाईल चोरुन नेला होता.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला. तपास पथकाला बातमीदारामार्फत बातमी मिळाली. त्यावरुन पोलिसांनी अवघ्या ८ तासात चौघांना पकडले. त्यांच्याकडून चोरलेला मोबाइल व गुन्हा करण्यासाठी वापरलेल्या २ मोटारसायकली असा १ लाख ५७ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस अंमलदार सागर जगदाळे, रामहरी वणवे, संभाजी देवीकर, अण्णा माने, बाजीराव वीर, प्रविण दडस, सुरज कुंभार, प्रशांत सुतार, सचिन सोनवणे, राहुल कर्डीले व अशोक गिरी यांनी केली आहे.
