Pune Crime News | तरुणीच्या घरात शिरुन तिचा विनयभंग करणार्या नराधमाला काळेपडळ पोलिसांनी केले जेरबंद
पुणे : Pune Crime News | तरुणी घरात झोपली असताना तिच्या घरात शिरुन तिच्याशी अश्लिल वर्तन करुन तिचा विनयभंग करणार्या नराधमाला काळेपडळ पोलिसांनी अटक केली आहे.
सलमान मुराद सय्यद Salman Murad Syed (वय २२, रा. कडनगर चौक, महंमदवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणींने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ६ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या घरात झोपलेल्या होत्या. सलमान सय्यद हा त्यांच्या घरात शिरला. त्यांच्याजवळ येऊन फिर्यादी यांच्या पायाला हात लावून फिर्यादी यांना मी तुझ्यासाठी आलो आहे, असे म्हणाला. फिर्यादीचे गालाला व तोंडाला हात लावून त्यांचा विनयभंग केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर तपास करीत आहेत.
