Pune Crime News | एकतर्फी प्रेमातून महिलेचा खुन करणारा नराधम अटकेत; दुहेरी हत्याकांडाचा प्रकार उघडकीस, आतापर्यंत चार खून केल्याचे निषन्न
पुणे : Pune Crime News | आपल्याबरोबर कामाला असलेल्या महिलेवर एकतर्फी प्रेमातून विकृत माणसाने तिचा खुन केला. त्याचबरोबर आणखी एकाचा खुन केल्याचे उघडकीस आले आहे. या विकृत माणसाने आतापर्यंत चार जणांचे खुन केल्याचे समोर आले आहे.
जैतू चिंधू बोरकर (वय ४३, रा. कोयंडे, ता. खेड) असे या विकृत माणसाचे नाव आहे. त्याने रंजना अरुण वाघमारे (वय ३५, रा. खांडपे, ता. कर्जत, जि़ रायगड) आणि सुरज अंकुश वाघ (वय ३०, रा. वांगणी, ता. बदलापूर, जि़ ठाणे) या दोघांचा खुन केला होता.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी याबाबत माहिती दिली. सुपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काळखैरेवाडी ( ता. बारामती) येथील खैरेपडळ येथे एका महिलेचा मृतदेह १९ जानेवारी रोजी सकाळी आढळून आला होता. तिच्या डोक्यावर जखमा झालेल्या होत्या. खुनाचा हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व सुपा पोलीस ठाण्यातील पथक शोध घेत होते. घटनास्थळी व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात एक जण संशयित व्यक्तीची हालचाल दिसून आले. घटनास्थळावर एक डायरी मिळाली होती.
या परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे लालासाहेब मारुती जाधव (रा. पिसर्वे, ता. पुरंदर) यांच्याकडे चौकशी केली. ते चिंचाची झाडे खरेदी करुन चिंचा झोडण्याचे काम करतात. त्यांना फुटेज दाखविले असता त्यांनी संशयित जैतू बोरकर असल्याचे सांगितले. जैतू बोरकर याला खेड परिसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर जैतू बोरकर बरोबर कोयंडे परिसरात मजुरी कामासाठी रंजना वाघमारे व सुरज वाघ हे होते. जैतू बोरकर याचे रंजना वाघमारे हिच्यावर एकतर्फी प्रेम होते. तो तिला त्याच्या सोबत राहण्याची जबरदस्ती करत होता. महिलेने विरोध दर्शविल्यामुळे जैतू बोरकर याने रागाच्या भरात १७ जानेवारी रोजी रात्रीचे वेळी कोयंडे गावातील चोर्याचा डोंगर परिसरात सुरज वाघ याच्या डोक्यात कोयत्याने मारहाण करुन त्याचा खुन केला. रंजना वाघमारे हिला घेऊन सुपा परिसरात निघून गेला.
१८ जानेवारी रोजी सुपा येथील काळखैरेवाडी परिसरात रात्रीचे वेळी रंजना वाघमारे हिने त्याचे सोबत राहण्यास नकार दिला. ती पोलिसांकडे तक्रार करेल, या भितीने जैतू बोरकर याने तिच्या डोक्यात दगड मारुन खुन केल्याचे तपासात निष्पन्न झाले. खेड पोलीस ठाण्यात सुरज वाघ याच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जैतू बोरकर याला अटक केली. जैतू चिंधु बोरकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खेड पोलीस ठाण्यामध्ये २००७ व २०१८ मध्ये दोन खुनाचे गुन्हे दाखल आहेत. २०२६ मध्ये दोन असे आतापर्यंत ४ जणाचे खुनाचे गुन्हे दाखल झाले आहेत.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण, सुपा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब कारंडे, जिनेश कोळी, शंकर भवारी, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर क्षीरसागर, अजय घुले, निलेश शिंदे, स्वप्निल अहीवळे, अभिजित एकशिंगे, संदीप लोंढे, विशाल गजरे, महादेव साळुंखे, किसन ताडगे, रुपेश साळुंखे, राहुल भाग्यवंत, निहाल वणवे, तुषार जैनक, सोमनाथ होले, अश्विनी चांदगुडे, दीपालीा मोहिते, संतोष घोलप, अमोल चासकर, स्वप्निल लोहार, सागर शिंगाडे, सदाशिव मल्ले, संदीप लांडे, बाळकृष्ण साबळे, संतोष शिंदे, सोमनाथ गव्हाणे यांनी केली आहे.
