Pune Crime News | मुलगा नपुंसक असताना विवाह करवुन देऊन केली फसवणुक, धाराशिव येथील पतीसह 6 जणांवर समर्थ पोलिसांनी केला गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | मुलगा नपुंसक असताना त्याचा विवाह करुन फसवणुक केली तसेच तिच्याच चारित्र्याचा संशय घेऊन छळ केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी पतीसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका २३ वर्षाच्या विवाहितेने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी धाराशिव येथील पती, सासु, सासरे, नणंद, तिचा पती आणि चुलत सासरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचा १८ एप्रिल रोजी एका ३२ वर्षाच्या तरुणाशी विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवसांनी पती नपुंसक असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने याबाबतची माहिती सासू-सासर्यांना दिली. त्यानंतर सासू-सासरे आणि नातेवाईकांनी तिला धमकावले. पती नपुंसक असल्याचे कोणाला सांगितल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देऊन फिर्यादींचा छळ सुरू करण्यात आला. उलट त्यांनीच तिचे दुसर्याशी अफेअर आहे, असे म्हणून तिची बदनामी केली़ तसेच लग्नात मानपान केला नाही, म्हणून घरामध्ये फिर्यादींना सतत अपमानीत करुन माहेराहून सोने व पैसे घेऊन येण्यास सांगून फिर्यादी यांचा मानसिक व शारीरीक छळ केला, यानंतर फिर्यादी या माहेरी पुण्यात आल्या असून त्यांनी फिर्याद दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक मुगदुम तपास करीत आहेत.
