Pune Crime News | दारुच्या नशेत झालेल्या भांडणातून मित्राच्या डोक्यात बाटली व दगड घालून केला खुन; खराडी पोलिसांनी एकाला केली अटक
पुणे : Pune Crime News | एकत्र दारु पिल्यानंतर झालेल्या वादात मित्राच्या डोक्यात बाटली व दगड घालून खुन करण्याचा प्रकार खराडी येथे झाला. खराडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आकाश तरळे (वय २३, रा. खांदवेनगर) असे खुन झालेल्याचे तरुणाचे नाव आहे. विजय ऊर्फ जलवा संजय वाघमारे Vijay alias Jalwa Sanjay Waghmare (वय २३, रा. राजाराम पाटीलनगर, खराडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ही घटना खराडी स्वीट इंडिया चौक येथे गुरुवारी रात्री सव्वानऊ घडला.
याबाबत अमित भोसले यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमित भोसले, विजय वाघमारे आणि आकाश तरळे हे मित्र असून त्यांनी एकत्र दारु पिली. त्यानंतर ते स्वीट इंडिया चौक येथे गप्पा मारत बसले होते. त्यात त्यांच्यात वादावादी सुरु झाली. वादाचे रुपांतर भांडणात होऊन विजय वाघमारे याने त्याच्याकडील बाटली आकाश याच्या डोक्यात घातली. तेथील दगड उचलून डोक्यात घातला. जबर जखमी झालेल्या आकाशचा मृत्यु झाला. खराडी पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन विजय वाघमारे याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे तपास करीत आहेत.
