Pune Crime News | लग्नाचे आश्वासन देऊन लैंगिक अत्याचार करुन महिलेचे अश्लिल व्हिडिओ नातेवाईकांना पाठवून बदनामी करण्याची दिली धमकी
पुणे : Pune Crime News | सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख करुन घेऊन लग्नाचे आश्वासन देऊन त्याने महिलेवर लैंगिक अत्याचार केले. तिच्याकडून वेगवेगळी कारणे सांगून २ लाख १० हजार रुपये घेतले. महिलेने पैसे परत मागितल्यावर महिलेच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट उघडून तिचे अश्लिल फोटो व व्हिडिओ नातेवाईकांना पाठवून बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत एका ३७ वर्षाच्या महिलेने फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी आर्यन ऊर्फ तनुराग संजय शर्मा Aryan alias Tanurag Sanjay Sharma (वय ३२, रा. शर्मा हाऊस, सेक्टर ६७, मोहाली, पंजाब) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार एप्रिल २०२० पासून ते १ फेब्रुवारी २०२६ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आर्यन शर्मा याने फिर्यादीशी सोशल मीडियाचे माध्यमातून ओळख करुन लग्नाचे आश्वासन दिले. त्यांच्याशी वारंवार शारीरीक संबंध ठेवले. फिर्यादी यांना वेळोवेळी वेगवेगळी कारणे देऊन त्यांच्याकडून २ लाख १० हजार रुपये घेतले. फिर्यादी यांनी हे पैसे परत मागितल्यावर आर्यन शर्मा याने फिर्यादी यांच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट उघडले. त्यावरुन फिर्यादी यांचे नातेवाईकांना फोटो व व्हिडिओ पाठवून त्यांची बदनामी करेन, अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक ढावरे तपास करीत आहेत.
