Pune Crime News | कोचिंग क्लासमधील अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करणार्‍या ऑफिस बॉयला मार्केटयार्ड पोलिसांनी केली  अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | महिला, अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना सध्या सर्वत्र चर्चेचा विषय झाला असतानाच एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मार्केटयार्ड पोलिसांनी या नराधम ऑफिसबॉयला अटक केली आहे.

विकास दिलीप गायकवाड Vikas Dilip Gaikwad  (वय ३१, रा. गोकुळनगर, कात्रज मुळ रा. हराळवाडी, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे अटक केलेल्या ऑफिसबॉयचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास गायकवाड हा मार्केटयार्ड परिसरातील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये गेल्या ८ ते १० वर्षांपासून ऑफिसबॉय म्हणून काम करतो. या क्लासमध्ये ७ ते १० वी पर्यंतच्या मुलांच्या शिकवणीचे क्लास घेतले जातात. विकास गायकवाड याने एका आठवीत शिकणार्‍या मुलाला स्टोअर रुममध्ये नेऊन अश्लील कृत्य केले. या मुलाने ही बाब आपल्या वडिलांना  सांगितली.  त्यानंतर वडिलांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मार्केटयार्ड पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन विकास गायकवाड याला अटक केली आहे.

You may have missed