Pune Crime News | विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या ! आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या पती, सासु, दीर, नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल

New Project (7)

पुणे : Pune Crime News | कौटुंबिक कारणावरुन विवाहितेचा शारीरीक छळ करुन माहेर सोडून घटस्फोट देण्यासाठी मानसिक दबाव आणला. त्यावरुन विवाहितेने सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. कोंढवा पोलिसांनी पती, सासु, दीर आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे़

दिशा निलेश शहा (वय २५) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत हितश्री संदेश शहा (वय ५७, रा. सोमजी हाईटस, श्रद्धानगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी पती निलेश शहा, सासु संगीता शहा, दीर प्रशांत शहा (तिघे रा. भुगाव) आणि नणंद ममता व्होरा (रा. नाशिक) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिशा हिचा निलेश दिलीप शहा (वय ३०, रा. माऊंट ब्लेएर सोसायटी, भुगाव) याच्याबरोबर जैन समाजातील रुढी परंपरानुसार २० डिसेंबर २०२४ रोजी विवाह झाला. निलेश शहा हा खासगी नोकरी करतो. त्याने लग्न झाल्यानंतर दिशा हिला नोकरी सोडायला लावली. विवाह झाल्यानंतर तिला सर्व जण त्रास देत होते. तु स्लो आहेस, तुला संसार जमत नाही. तसेच तुझे डोळे छोटे आहेत, असे बोलून तिला त्रास देत करत. दिशा हिला स्वयंपाक करायला लावायचे व तिने बनवलेले कोणीही खात नसे, अशा प्रकारे तिचा मानसिक छळ करत होते. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पती निलेश शहा, संगीता शहा, ममता व्होरा हे दिशाला घेऊन तिच्या माहेरी आले. ममता व्होरा फिर्यादींना म्हणाली की, दिशाच लग्न का केलं. निलेश बोलला की तिला प्रपंच जमणार नाही, असे बोलून तिला माहेरी सोडून निघून गेले. त्यानंतर २८ सप्टेंबर रोजी निलेश व संगीता शहा हे तिचे कपडे घेऊन आले. त्यावेळी निलेश याने दिशापासून घटस्फोट घ्यायचा आहे. त्या दोघांनी दिशासोबत वाद घालून तिच्या गळ्यातील दीड तोळयाचे सोन्याचे मंगळसुत्र, कानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने घेऊन गेले. त्यामुळे दिशा मानसिक तणावात होती.३ ऑक्टोंबर रोजी दुपारी दीड वाजता फिर्यादी या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. तेथून थोड्या वेळात परत आल्यावर दिशा हिने हॉलमधील सिलिंग फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्याबाबतचे धार्मिक विधी पूर्ण केल्यानंतर आता हितश्री शहा यांनी फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे तपास करीत आहेत.

You may have missed