Pune Crime News | सासरी होणार्‍या छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन संपविले आपले जीवन; बिबवेवाडी पोलिसांनी 7 जणांना केली अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News |  सासरी होणार्‍या छळाला कंटाळून विवाहितेने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन आपले जीवन संपविले. बिबवेवाडी पोलिसांनी सासरच्या ७ जणांना अटक केली आहे.

पती सर्जेराव जाधव (वय ३८), सासरे माणिकभाऊ जाधव (वय ७०), सासु जयश्री माणिक जाधव (वय ६५), लक्ष्मी रामचंद्र कांबळे (वय ४०), पुष्पा दयानंद लोंढे (वय ३५), रोहन दयानंद लोंढे (वय २२) आणि अनुराधा माणिक जाधव (वय ३२, सर्व रा. शेळके वस्ती अप्पर बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. सुवर्णा सर्जेराव जाधव (वय ३३, रा. शेळके वस्ती, अप्पर बिबवेवाडी) असे मृत्यु पावलेल्या विवाहितेचे नाव आहे. ही घटना २०१६ पासून ११ एप्रिल २०२६ पर्यंत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुवर्णा हिचा सर्जेराव जाधव याच्याबरोबर विवाह झाला होता. लग्नानंतर सुवर्णा हिला छोट्या मोठया कारणावरुन वेळोवेळी शिवीगाळ करुन मारहाण करत. तिला शारीरीक व मानसिक त्रास देत होते. या त्रासाला कंटाळून ११ एप्रिल २०२६ रोजी सुवर्णा हिने गळफास घेऊन आपले जीवन संपविले. बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींना अटक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक बाळू चोपडे तपास करीत आहेत.

You may have missed