Pune Crime News | पुणे-मुंबई प्रवासात पुण्यातील व्यावसयिकाला गुंगीचे औषध देऊन लुटले, प्रवासी तब्बल 80 तास बेशुद्ध; आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक

Arrest

पुणे / मुंबई : Pune Crime News | पुणे-मुंबई शिवनेरी बसमधून (Pune Mumbai Shivneri Bus) प्रवास करणाऱ्या व्यावसायिकाला कॉफीमधून गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या आरोपीला माटुंगा पोलिसांनी (Matunga police station) उत्तर प्रदेशातील मेरठ येथून अटक केली आहे. आरोपीने दिलेल्या गुंगीच्या औषधामुळे व्यावसायिक तब्बल 80 तास बेशुद्ध होते. आरोपीने व्यावसायिकाकडील तीन लाख 70 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरला होता.

युनुस शफिकुद्दीन शेख (वय-52 रा. मेरठ, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत शैलेंद्र साठे (वय-57 रा. बाणेर, पुणे) यांनी माटुंगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न यासह गुंगीचे औषध देऊन चोरी केल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून तीन तोळे सोने जप्त केले असून त्याच्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.

जाहिरात एजन्सी चालवणारे शैलेंद्र साठे 14 जून रोजी शिवनेरी बसने पुण्याहून मुंबईकडे येत होते. शेख यांने साठे यांच्यासोबत ओळख केली. खालापूर येथे बस थांबल्यानंतर शेख याने साठे यांना कॉफीमधून गुंगीचे औषध दिले. साठे बेशुद्ध होताच त्यांच्याकडील किमती ऐवज काढून घेत आरोपी दादर परिसरात उतरला. बस दादर थांब्यावर थांबताच कर्मचाऱ्यांनी बेशुद्ध अवस्थेत असलेल्या साठेंना फुटपाथवर आणून बसवले. साठे बराच वेळ त्याठिकाणी झोपले. त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला आणि त्यांना ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. साठे तब्बल 80 तास बेशुद्ध होते. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी 20 जून रोजी माटुंगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी बस मार्गावरील खालापूर फूट मॉल, दादर आणि मुंबई सेंट्रल येतील सर्व स्थानकावरील सीसीटीव्ही तपासले.
त्यात दोन संशयित आढळून आले. गुन्हा केल्यानंतर शेख दादारमध्ये तर, त्याचा साथीदार चेंबूर येथे उतरला.
त्यानंतर दोघांनी मुंबई सेंट्रल येथून दिल्लीला जाणारी ट्रेन पकडली.
तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा ठावठिकाणा लागताच पोलिसांचे एक पथक मेरठला रवाना झाले. पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली.

ही कारवाई पोलीस उपायुक्त प्रशांत कदम, सहायक पोलीस आयुक्त संजय जगताप,
माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण
यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी संजय परदेशी, संतोष माळी, जयेंद्र सुर्वे आणि अंमलदार यांच्या पथकाने केली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे : सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक परिसरात बेकायदा पिस्तूल मित्राला दाखवताना गोळीबार, एक जखमी

Mumbai Police Constable Wife Suicide | हुंड्यासाठी पोलीस पतीचे टोमणे, हळद उतरण्यापूर्वीच पत्नीने आयुष्य संपवलं!

Vidhan Parishad Election Maharashtra | विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस वोटींगची भीती; कोणते उमेदवार डेंजर झोनमध्ये?

Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड

You may have missed