Pune Crime News | अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरीक संबंध ठेवून केले गर्भवती; सहकारनगर पोलिसांनी नराधमाला केली अटक

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | सोशल मीडियावरुन ओळख वाढवून कुत्रा दाखविण्यासाठी अल्पवयीन मुलीला घरी बोलावले. तिला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरीक संबधं प्रस्थापित केले. त्यातून ही अल्पवयीन मुलगी गर्भवती असल्याचे उघड झाले आहे. सहकारनगर पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे.

प्रथमेश ज्ञानेश्वर राऊत Prathamesh Dnyaneshwar Raut (वय २३, रा. बालाजी हाईटस, गणेश दुध डेअरी समोर, धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका १६ वर्षाच्या युवतीने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२५ ते ३ जानेवारी २०२६ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश राऊत याने या युवतीबरोबर इंस्टाग्राम या सोशल मीडियावर ओळख वाढविली. तिला कुत्रा दाखवण्याच्या बहाण्याने घरी बोलावले. ती घरी आल्यावर तिला ‘मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे,’ असे सांगून ती नकार देत असताना तिच्याबरोबर जबरदस्तीने शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर ‘हे सगळ कॉमन आहे,’ असे बोलून तिच्यासोबत पुन्हा जबरदस्तीने शारिरीक संबंध केले. त्यानंतर आता या युवतीला उलटीचा त्रास होत असल्याने तिची सोनोग्राफी केली. तेव्हा डॉक्टरांनी ती १० आठवड्याची गर्भवती असल्याचे सांगितले. तिच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाखाली गुन्हा दाखल केला आहे़ पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करीत आहेत.

You may have missed