Pune Crime News | लोन अॅपच्या माध्यमातून तरुणाला बदनामी करण्याची धमकी देऊन उकळले पैसे; मुंढवा पोलिसांनी केला गुन्हा दाखल
पुणे : Pune Crime News | लोन अॅपच्या माध्यमातून तरुणाची बदनामी करण्याची लोनचे पैसे परत भरायला लावून पैसे उकळण्याची घटना समोर आली आहे.
याबाबत एका २९ वर्षाच्या तरुणाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार जानेवारी २०२६ ते आतापर्यंत घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाने ३० हजारांचे ऑनलाईन कर्ज घेतले होते. त्याचे पैसे त्याने भरल्यानंतरही त्याला कर्जाचे पैस पुन्हा भरण्यास सांगितले. त्याच्या मोबाईलमधील फोटो गॅलरीतील फोटो एडीट करुन त्याचे न्युड फोटो तयार केले. हे फोटो त्याच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील परिचितांना पाठवण्याची धमकी देत आहे. तसेच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याची बदनामी करत आहेत.
घाबरलेल्या या तरुणाने सुरुवातीला कर्जाची रक्कम फेडली असतानाही आणखी पैसे भरले. तरीही त्यांची मागणी थांबत नव्हती. शेवटी त्यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक तपास करीत आहेत.
