Pune Crime News | वाघोलीत आईने 11 वर्षाच्या मुलाचा गळा चिरुन केला निर्घुण खुन; 13 वर्षाच्या मुलगी अत्यवस्थ, शहरात खळबळ
पुणे : Pune Crime News | वाघोली येथील बाईफ रोडवर राहणार्या एका इमारतीत आईने मुलाचा गळा चिरुन निर्घुण खुन केला. मुलीच्या ही गळ्यावर तिने चाकूने वार केला. तिने आरडाओरडा केल्याने सध्या ती बचावली असून तिच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. ही घटना मंगळवारी सकाळी समोर आली.
सोनी संतोष जायभाय (वय ३०) असे खुन करणार्या आईचे नाव आहे. मुलगा साईराज संतोष जायभाय (वय ११) याचा मृत्यु झाला आहे. मुलगी धनश्री संतोष जायभाय (वय १३) हिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत असून ती अत्यवस्थ असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोनी जायभाय हिने आपल्या ११ वर्षाचा मुलगा साईराज याच्या गळ्यावर वार करुन त्याचा खुन केला. हे पाहून धनश्री हिने आरडाओरडा करायला सुरुवात केली. तेव्हा आईने तिच्यावरही वार करुन तिचा खुन करण्याचा प्रयत्न केला. धनश्रीचा आरडाओरडा ऐकून शेजारच्यांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी येऊन पाहिले असता सोनी जायभाय हि घरात बसलेली होती. तिच्या हातात चाकू होता. साईराज व धनश्री हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पोलिसांनी तातडीने त्यांना लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. साईराज याचा मृत्यु झाला. वाघोली पोलिसांनी सोनी जायभाय हिला ताब्यात घेतले. सोनी हिने असे का केले, याबाबत नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
