Pune Crime News | घर गळतीमुळे दुसरीकडे गेले रहायला; चोरट्याने साधला डाव, रेव्हन्यू कॉलनीतील घटना
पुणे : Shivaji Nagar Pune Crime News | घरात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी गळत असल्याने ते दुसरीकडे रहायला गेले. घर बंद असल्याने चोरट्याने डाव साधत भर दिवसा घरफोडी केली. (House Burglary In Pune)
याबाबत धनंजय प्रभाकर अवसरीकर (वय ६०, रा. किणीकर चौक, रेव्हन्यू कॉलनी – Revenue Colony Shivaji Nagar Pune) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station ) फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवसरीकर हे प्राध्यापक असून आपली पत्नी व मुलीसह रेव्हन्यू कॉलनीतील ३ मजली इमारतीत राहतात. सध्या त्यांच्या घरात पावसाने जास्त प्रमाणात गळत असल्याने बावधन येथे रहायला गेले आहे. घरात महत्वाचे सामान तसेच ठेवले आहे.
त्यांची मुलगी मॉर्डन हायस्कुल येथे शिकत असल्याने त्यांनी २४ जुलै रोजी सकाळी मुलीला शाळेत सोडले.
त्यानंतर ते कामासाठी पुणे विद्यापीठात गेले. सायंकाळी साडेपाच वाजता रेव्हन्यू कॉलनीतील घरी गेले.
तेव्हा त्यांचे घराचा दरवाजा उघडा होता.
घरातील सामान अस्तावस्त पडलेले दिसून आले.
बेडरुममधील लाकडी कपाटातील अमेरिकन चलनाच्या ५० डॉलरच्या २ नोटा तसेच जर्किन मध्ये ठेवलेले २० हजार रुपये,
चांदीची नाणी, चांदीचे फुलपात्र, चांदीचा दिवा असा ऐवज चोरट्याने चोरल्याने दिसून आले.
शिवाजीनगर पोलीस तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | बँकेच्या एटीएम मशीनमधील रोकड नेली चोरुन; चावीने एटीएम उघडून केली चोरी
Pune Court Crime News | पोटच्या मुलाच्या खुन केल्या प्रकरणी पित्याची निर्दोष मुक्तता