Pune Crime News | सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या नराधमाला मुंढवा पोलिसांनी केली अटक
पुणे : Pune Crime News | सहा वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणार्या नराधमाला मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे.
रवींद्र शामराव भिसे Ravindra Shyamrao Bhise (वय ५६, रा. राजीव गांधीनगर, रासगे आळी, मुंढवा) असे या नराधमाचे नाव आहे. पोलिसांनी रवींद्र भिसे याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १७ व १८ जानेवारीच्या रात्री घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र भिसे याने या अल्पवयीन मुलीला आपल्या घरी घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याची माहिती तिच्या आईला मिळाल्यानंतर त्यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करुन रवींद्र भिसे याला अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुरवसे तपास करीत आहेत.
