Pune Crime News | अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधमाला नांदेड सिटी पोलिसांनी केली अटक; घरात शिरुन घातली लग्नाची मागणी

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | घरात अल्पवयीन मुलगी एकटी असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधमाला नांदेडसिटी पोलिसांनी अटक केली. त्याने ही मुलगी एकटी असल्याचे पासून तिला मिठी मारुन थेट लग्नाची मागणी घातली होती.

लोकेश विठ्ठल लांडगे Lokesh Vitthal Landge (वय १९, रा. धायरी फाटा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार १० डिसेंबर २०२५ पासून ४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान सुरु होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना लोकेश लांडगे हा त्यांच्या घरात येत असे. तिची इच्छा नसताना तिच्याशी शारीरीक संबंध ठेवत होता. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांची मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा घेऊन लोकेश लांडगे घरात शिरला. त्याने या मुलीला मिठी मारुन तिला लग्नाची मागणी घातली. ही बाब तिने आईला सांगितले. त्यानंतर त्यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी लोकेश लांडगे याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के तपास करीत आहेत.

You may have missed