Pune Crime News | पान टपरी चालकाच्या डोक्यात लाकडी बांबुने मारुन केले गंभीर जखमी; मध्यरात्री रस्त्यात अडवून केली मारहाण

marhan

पुणे : Pune Crime News | मध्यरात्रीच्या वेळी रस्त्यात थांबवून गाडी बंद करायला सांगितले, त्यावर पान टपरी चालकाने उशीर झाल्याचे सांगितल्याने राग येऊन एकाने लाकडी बांबुने डोक्यात व हातावर मारहाण करुन गंभीर जखमी केले. (Attack On Pan Shop Owner)

https://www.instagram.com/p/DAakqy-pzoW

याबाबत मुकेशकुमार शिवप्रसाद शुक्ला (वय ४२, रा. वैदुवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मच्छिंद्र प्रकाश गायकवाड (वय ३७, रा. चतु:श्रृंगी मंदिरासमोरील फुटपाथ, सेनापती बापट रोड), याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सेनापती बापट रोडवरील (SB Road Pune) चेतन स्नँक सेंटर समोर गुरुवारी रात्री सव्वाबारा वाजता घडला.

https://www.instagram.com/p/DAacDgVI6hN/?img_index=1

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुक्ला यांच्यावर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहे. त्यांची विद्यापीठ रोडवरील प्राईड हाऊस शेजारी श्री पान शॉप नावाची पान टपरी आहे. गुरुवारी रात्री ते पान टपरी बंद करुन मोटारसायकलवरुन घरी जात होते. यावेळी चेतन स्रँक सेंटर समोर त्यांच्या ओळखीचा मच्छिंद्र गायकवाड यांनी त्यांना थांबविले. त्याने फिर्यादीला दोन मिनिटे थांब तुझ्याकडे काम आहे.

https://www.instagram.com/p/DAaYoyTJ4-S

गाडी बंद कर, असे बोलले. त्यावर फिर्यादी यांनी त्यास मला वेळ झाला आहे. मला जायचे आहे, असे बोलले. त्याचा राग येऊन गायकवाड याने फिर्यादीच्या मोटारसायकलवर लाथा मारायला सुरुवात केली. तो शिवीगाळ करु लागला. तेव्हा फिर्यादी यांनी त्याला असे का करतो, असे विचारले. त्यावर त्याने तू जा असे बोलून तेथे ठेवलेला लाकडी बांबुने फिर्यादीच्या डोकयात मारुन जबर दुखापत केली. त्यानंतरही तो पुन्हा लाकडी बांबुने मारहाण करु लागला. तेव्हा त्यांनी बांबुचा मार हातावर घेतला. त्यांच्या डोक्यातून रक्त येऊ लागल्याने त्यांनी आरडा ओरडा केला. तेव्हा त्यांच्या ओळखीचे लोक आले. त्यांनी गाडीमधून उपचारासाठी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची फिर्याद घेतली असून पोलीस उपनिरीक्षक कराड तपास करीत आहेत.

https://www.instagram.com/p/DAaW8DWpNr6

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Viman Nagar Pune Crime News | प्रवासादरम्यान माझ्याजवळ झोप असे म्हणत बसचालकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Sanjay Raut Sentenced | विधानसभेच्या तोंडावर संजय राऊतांच्या अडचणीत वाढ;
कोर्टाने सुनावली 15 दिवसांच्या कारावासाची शिक्षा, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime News | पुणे : धमकी देऊन बलात्कार करणार्‍यास पोलिसांनी केली अटक

Amit Shah On Sharad Pawar | ‘शरद पवारांसह त्यांच्या घटक पक्षांना पराभूत करा’,
अमित शहांचे कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले – ‘भाजप असा पक्ष आहे, ज्याने…’

You may have missed