Pune Crime News | दरमहा 5 हजार हप्ता दे, नाही तर स्टॉल खाली कर; तडीपार गुन्हेगाराने स्टॉलधारकाला मारहाण करुन जीवे मारण्याची दिली धमकी

Pune Crime News | Pay 5 thousand installments every month, otherwise take down the stall; A criminal from Tadipar threatened to beat up the stall owner and kill him

पुणे : Pune Crime News |  खडकी बाजार, रॉयल हॉटेल, टिकाराम चौक येथील सर्व स्टॉल धारकाकडून दरमहा हप्ता गोळा करणार्‍या सराईत गुन्हेगाराने एका स्टॉल धारकाचा स्टॉल दुसर्‍याला देण्यासाठी दरमहा ५ हजार रुपये हप्ता दे, नाही तर जागा खाली कर, असे म्हणून मारहाण करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत एका ४४ वर्षाच्या कापड विक्रेत्याने खडकी बाजार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन तडीपार गुंड सलमान शेख (रा. खडकी) याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे गेल्या १० वर्षापासून खडकी बाजार येथील रॉयल हॉटेल, टिकाराम चौक येथे कपड्याचा स्टॉल आहे. ते व पत्नी हे कपड्याचा व्यवसाय करतात. त्यांच्याकडे खडकी कॅन्टोन्मेंट कडील पथारी व्यवसायाचे लायसन्स आहे. त्यांच्या बाजूला सलमान शेख याचा कपड्याचा स्टॉल असून त्याने तो आदिल मेहमुद अन्सारी याला भाड्याने दिला आहे. सलमान शेख हा खडकी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर बरेच गुन्हे आहेत. पोलिसांनी यापूर्वी त्याला तडीपार देखील केले होते. या भागात त्याची मोठी दहशत आहे. या दहशतीचा गैरफायदा घेऊन सलमान शेख परिसरातील सर्व स्टॉल धारकाकडून २०० रुपये, ३०० रुपये, ५०० रुपये प्रमाणे मनाला वाटेल तेव्हा हप्ता गोळा करीत असतो.

त्याच्या दहशतीमुळे फिर्यादीही त्याला हप्ता देत होते. फिर्यादी व्यवसाय करीत असलेली जागा सलमान शेख याला बळकवायची असून त्या ठिकाणी आणखी एक भाडेकरु ठेवायचा आहे. फिर्यादी तेथून जात नाही, हे पाहून तसेच त्याचे दहशतीचा गैरफायदा घेऊन १५ मार्च २०२६ रोजी रात्री साडेआठ वाजता सलमान शेख स्टॉलवर आला. फिर्यादी यांना म्हणाला की, दरमहा ५ हजार रुपये हप्ता दे नाहीतर ही जागा खाली कर, असे म्हणून धमकावु लागला. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला माझ्याकडे कॅन्टोन्मेंटचे लायसन्स आहे. मी तुला माझी जागा देणार नाही, असे म्हणाले. त्यावर सलमान शेख याने त्यांच्या अंगावर धावत येऊन हाताने मारहाण केली. फिर्यादी व त्यांच्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करीत आहेत.

You may have missed