Pune Crime News | लिफ्ट देणे पडले महागात; मोटारसायकल नेली चोरुन
पुणे : Pashan Pune Crime News | मोटारसायकलवरुन जात असताना एकाने हात दाखविल्याने त्यांनी लिफ्ट दिली. वाटेत पान खाण्यासाठी थांबले असताना लिफ्ट दिलेल्याने मोटारसायकल चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत सचिन प्रकाश खेडेकर (वय ३०, रा. सोमेश्वरवाडी, पाषाण) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshrungi Police Station) फिर्याद दिली आहे. ते वाहनचालक म्हणून काम करतात. २१ जुलै रोजी रात्री साडेदहा वाजता ते सोमेश्वरवाडी येथून बाणेरकडे (Someshwar Wadi To Baner) मोटारसायकलवरुन जात होते. तेव्हा वाटेत एका तरुणाने हात करुन मला बाणेरकडे जायचे आहे, असे सांगून लिफ्ट मागितली. तेही बाणेरकडे जात असल्याने त्यांनी लिफ्ट दिली.
वाटेत ग्रीन पार्क हॉटेलच्या पानाच्या टपरीसमोरील रोडवर मोटारसायकल उभी केली. चावी गाडीलाच होती. लिफ्ट दिलेला तरुण गाडीजवळच थांबला. ते पान खाण्यासाठी टपरीवर गेले. पान खाऊन परत गाडीजवळ आले. तोपर्यंत लिफ्ट दिलेला तरुण त्यांची मोटारसायकल घेऊन पळून गेला होता. हवालदार शिरसाठ तपास करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | नवीन मोटारसायकलची राईड बेतली जीवावर ! पाण्याच्या टँकरच्या धडकेत तरुणाचा मृत्यु