Pune Crime News | पुणे शहरात पादचाऱ्यांना लुटण्याच्या घटना वाढल्या, चार पादचाऱ्यांना दुचाकीस्वांनी लुटले

crime-logo

पुणे : Pune Crime News | गेल्या काही दिवसांत पुणे शहरातील वेगवेगळ्या भागांत पादचाऱ्यांना लुटण्याच्या घटना वाढल्या आहेत. स्वारगेट (Swargate Police Station), बिबवेवाडी (Bibvewadi Police Station), मार्केटयार्ड (Market Yard Police Station) भागात चोरट्यांनी पादचाऱ्यांकडील मोबाईल (Mobile Theft Case) तसेच दागिने चोरुन नेल्याच्या घटना घडल्या आहेत. (Theft Case)

पहिल्या घटनेत गिरीधर भवन चौकात मंगळवारी (दि.16) दुपारी सव्वा चारच्या सुमारास तरुणाला अडवून चोरट्यांनी त्यांच्याकडील मोबाईल आणि कागदपत्रे चोरुन नेल्याची घटना घडली. याबाबत संजय तुकाराम कानगुडे (वय-34 रा. कोथरुड) याने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तो मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास गिरीधर भवन चौकातून निघाला होता. त्यावेळी दोन चोरटे दुचाकीवरुन आले. चोरट्यांनी त्याला अडवून धमकावले. तरुणाकडील सतरा हजार रुपयांचा मोबाईल आणि कागदपत्रे ठेवलेली पिशवी चोरुन नेले.

दुसऱ्या घटनेत स्वारगेट भागातील लक्ष्मीनारायण चौक, साबळे हाऊस ते कात्रज रोड परिसरात पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील सतरा हजार रुपयांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरुन नेली. याबाबत इमलाबाई मगनलाल ओसवाल (वय-72 रा. शुक्रवार पेठ) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन्ही गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले करत आहेत.

चोरीची तिसरी घटना अप्पर इंदिरानगर परिसरातील सुखसागरनगर भागात घडली आहे. पतीसोबत शतपावली करत असलेल्या महिलेच्या गळ्यातील पावणे दोन लाख रुपयांची सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरून नेले. वैशाली सतिष गव्हाणे (वय-45 रा. सुखसागर नगर) यांनी याबाबत बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण काळोखे करीत आहेत.

तर चौथी घटना बिबवेवाडी परिसरात 52 वर्षीय महिलेला पत्ता विचारून दुचाकीस्वार दोघे पुढे निघून गेले.
त्यानंतर त्याच दुचाकीस्वारांनी पाठीमागून येत त्यांच्या गळ्यातील 35 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून पळ काढला.
याप्रकरणी संगिता गोविंद सलगरल (रा. बिबवेवाडी) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे करत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

MLA Sunil Tingre | वडगाव शेरी, धानोरी भागातील पूरग्रस्तांचे सर्व्हेक्षण करुन नुकसान भरपाई देणार;
आमदार सुनिल टिंगरे यांच्या लक्षवेधीवर मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन

Pune Crime News | पुणे: येरवड्यात पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगाराची ‘गेम’; कोयत्याने वार करुन खून करणाऱ्या तिघांना अटक

Eknath Shinde – Ashadhi Ekadashi | ‘पुढच्या वर्षी मीच मुख्यमंत्री म्हणून येणार की नाही… ‘ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

You may have missed