Pune Crime News | मतदानासाठी रस्त्यावर उतरलेले लोक, कडक पोलीस बंदोबस्तामुळे गुन्हेगारी ‘निरंक’ ! किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत तर गुन्ह्यांमध्येही मोठी घट
पुणे : Pune Crime News | विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election 2024) प्रचार संपल्यानंतर कोठेही गडबड होऊ नये, यासाठी गेले दोन दिवस सुरु असलेला कडक बंदोबस्त, बुधवारी मतदानासाठी रस्त्यावर उतरलेले पुणेकर यामुळे शहरातील गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे दिसून आले आहे. खुन, जबरी चोरी, दरोडा, घरफोडी, गर्दी मारामारी यापैकी एकाही घटनेची बुधवारी शहरात नोंद झाली नाही.
राज्यभरात मतदान सुरु असताना अनेक हिंसक घटना घडल्या. परंतु, पुणे शहरात एकही दखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली नाही. पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांची समंजस भूमिका यामुळे शहरातील मतदान काल संपूर्ण शांततेत पार पडले. त्यामुळे शहरात एक गंभीर गुन्हा वगळता कोणताही गंभीर गुन्ह्याची नोंद झाली नाही.
दररोज शहरातून किमान ४ ते ५ वाहन चोरीची नोंदी शहरातील पोलीस ठाण्यात होत असते. संपूर्ण दिवसभर पोलिसांचा बंदोबस्त,वाहन चेकिंग होत असल्याने बुधवारी शहरात एकही वाहन चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला नाही. शहरात बुधवारी सर्व मिळून केवळ २२ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा १, दुखापतीचे ३, चोरीचे २ हे दखलपात्र गुन्हे आहेत.
निवडणुका सुरु झाल्यापासून पोलिसांची गस्त वाढल्याने गुन्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसात घट झाली आहे.
१३ नोव्हेंबरला एकूण ३७ गुन्हे, ९ नोव्हेंबरला ३९ गुन्हे, ५ नोव्हेंबरला ४७ गुन्ह्यांची नोंद झाली होती.
१९ ऑक्टोंबर रोजी ३९ गुन्ह्यांची नोंद झाली होती.
हे पाहता बुधवारी गुन्ह्यांमध्ये मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे. (Pune Crime News)
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/
Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Police Tadipari Action | येरवडा परिसरातील 4 सराईत गुन्हेगार तडीपार ! पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केली कारवाई
Maharashtra Assembly Election 2024 | दहा हजाराहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्र इमारतींच्या ठिकाणी वाहन तळासाठी अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध