Pune Crime News | पिंपरी: कार विक्रीच्या बहाण्याने 9 लाखांची फसवणूक, तिघांवर FIR

Fraud

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | विक्रीसाठी नसलेल्या कारची विक्री करायची असल्याचे भासवून कारची 9 लाखांना विक्री केली. त्यानंतर कागदपत्रे नंतर देतो असे सांगितले. परंतु, ती कार विक्रीसाठी नसल्याचे कारच्या मूळ मालकाने सांगित्यानंतर फसवणूक झाल्याचे समोर आले (Cheating Fraud Case). हा प्रकार 16 जानेवारी 2024 ते 2 मार्च 2024 या कालावधीत फिट अँड फाईन वाल्हेकरवाडी चिंचवड (Walhekarwadi Chinchwad) आणि डायमंड मोटर्स काळेवाडी फाटा (Diamond Motors Kalewadi Phata) येथे घडला.

याबाबत विनोदकुमार बाळु गावडे (वय-45 रा. ज्ञानदिप कॉलनी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार डायमंड मोटर्स काळेवाडी फाटा येथील व्यवस्थापक अजित कुलाल, काकडे, नितेश पवार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात आयपीसी 406, 420, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचे कार दुरुस्तीचा व्यवसाय आहे. आरोपी अजित कुलाल याने एमएच 12/व्हीटी 1944 ही अर्टिगा कार विक्रीसाठी नसल्याचे माहित असताना देखील कार विक्रीसाठी असल्याचे गावडे यांना सांगितले. गावडे यांचा विश्वास संपादन करून कारच्या मोबदल्यात नऊ लाख रुपये घेतले. कारचे कागदपत्रे 20 दिवसांनी देतो असे सांगितले.

दरम्यान, कुलाल याने गाडीची कागदपत्रे दिली नसल्याने गावडे यांनी कारच्या मूळ मालकाला भेटून कागदपत्रांबाबत विचारणा केली.
त्यावेळी ती कार विक्रीसाठी नसल्याचे समजले.
त्यानंतरही कुलाल याने कागदपत्र देतो, असेच गावडे यांना सांगितले.
2 मार्च रोजी गावडे यांनी वाल्हेकरवाडी येथील फिट अँड फाईन,
ओंकार इंडस्ट्रीज येथे मोकळ्या जागेत गाडी लॉक करुन पार्क केली होती.
आरोपींनी नितेश पवार याच्या मार्फत दुसऱ्या चावीचा वापर करून कार घेऊन जात फसवणूक केली.
चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Reliance Retail | अनंतच्या विवाहापूर्वी नवीन बिझनेस सुरू करण्याची तयारी,
‘या’ व्यवसायात एंट्री करणार मुकेश अंबानी, चीनची कंपनी आणणार भारतात

Pune Crime News | पुणे: गाडीत बसण्यास नकार दिल्याने अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन, एकाला अटक

Gautam Gambhir | गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाहांची घोषणा

Pune Bopodi Hit & Run Case | पुणे पोलीस हवालदार मृत्यू प्रकरण : कारमधील तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात,
कारला ओव्हरटेक केल्याचा आला राग, भरधाव वेगात कार चालवली अन्…

You may have missed