Pune Crime News | पिंपरी : भांडण सोडवणाऱ्या अल्पवयीन मुलाला मारहाण; एकाला अटक

marhan

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | भांडण मिटवण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाला तीन जणांनी बेदम मारहाण (Marhan) करुन डोक्यात सिमेंटचा ब्लॉक करून गंभीर जखमी केले (Attack On Youth). हा प्रकार शनिवारी रात्री नऊच्या सुमारास रुपीनगर, तळवडे (Rupeenagar Talawade) येथील सार्वजनिक रोडवर घडला आहे. याप्रकरणी चिखली पोलिसांनी (Chikhali Police Station) तिघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे.

याबाबत रुपीनगर येथे राहणाऱ्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन रुपिकेश विजय चव्हाण (वय-19 रा. माता रमाई हौसिंग सोसायटी, राहुलनगर, निगडी) याला अटक केली आहे. तर संस्कार सतीश यलशेट्टी (रा. रुपीनगर, तळवडे) व त्याच्या एका साथीदारावर बी.एन.सी. कलम 118(2), 115(2), 352, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपीनगर येथील पंचगंगा हौसिंग सोसायटी समोरील सार्वजनिक रोडवर आरोपी संस्कार याचे दोन मुलांसोबत भांडण सुरु होते. त्यावेळी फिर्य़ादी त्यांची भांडणे सोडवण्यासाठी गेला. त्यावेळी आरोपींनी तु आमच्या भांडणात का येतो असे बोलून शिवीगाळ केली. तसेच धक्काबुक्की करुन मारहाण केली. फिर्यादी खाली पडला असता संस्कार याने त्याठिकाणी पडलेला सिमेंटचा गट्टू डोक्यात मारून गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास पंचमुख (PSI Vikas Panchmukh) करीत आहेत.

पाच रुपये मागितल्याने मारहाण

वाकड : सार्वजनिक शौचालयात जाण्यासाठी पाच रुपये मागितल्याच्या कारणावरुन बेदम मारहाण करुन स्क्रु ड्रायव्हर डोक्यात मारुन गंभीर जखमी केले.
हा प्रकार शनिवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वाकड येथील भुजबळ चौकातील (Bhujbal Chowk Wakad) सार्वजनिक शौचालयात घडला.
याप्रकरणी पारसकुमार श्रीगोपीराम शर्मा (वय-39 रा. वाकड) याने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे.
त्यावरुन महंमद शाकीब (वय-25 रा. भुजबळ चौक, वाकड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

PMC Solid Waste Management Dept | पुणे: कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी मर्जीतील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर घुसवण्यासाठी घनकचरा विभागाचा ‘वरिष्ठां’वर दबाव

Pune Crime News | पुणे : व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आयटी तरुणाची आत्महत्या

Supriya Sule On Amit Shah | “शरद पवार भ्रष्टाचाराचे म्होरके”, अमित शहांच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

Shivsena UBT On Amit Shah | ‘आम्ही तुमच्यासारखे जिना फॅन्स क्लबचे सदस्य नाही’; अमित शहांच्या टीकेवर ठाकरे गटाचे प्रत्युत्तर

You may have missed