Pune Crime News | पिंपरी: अनैतिक संबंधाच्या कारणावरुन मारहाण, चार जणांना अटक
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | अनैतिक संबंध (Immoral Relationship) असल्याच्या संशयावरून चार जणांनी कट रचून महिलेच्या पतीला लाकडी दांड्याने डोक्यात मारुन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. ही घटना चाकण-शिक्रापूर रोडवरील (Chakan Shikrapur Road) भारत पेट्रोल पंपाजवळ 25 जून रोजी सकाळी साडे सहाच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी चाकण पोलस ठाण्यात (Chakan Police Station) चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपी निष्पन्न करुन महिलेसह चार जणांना अटक केली आहे.
याबाबत कडाचीवाडी येथे राहणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून एक महिला, राम आनंदराव श्रीरामे (रा. निघोजे ता. खेड), साईनाथ अशोक बेलकर (वय-23रा. राणुबाई मळा, ता. खेड), सागर संतोष शेळके (वय-20 रा. गायकवाड वस्ती, मोशी, ता. खेड) यांच्यावर आयपीसी 326, 324, 120(ब), 323, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या महिलेला तिच्या पतीचे आणि फिर्यादी यांच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. आरोपी महिलेने इतर आरोपींच्या मदतीने कट रचून फिर्यादी यांना मारण्यासाठी पाठवले. 25 जून रोजी सकाळी फिर्यादी नेहमी प्रमाणे चाकण-शिक्रापूर रोडवरुन कामावर जात होते. भारत पेट्रोल पंपाजवळ त्यांना तीने ते चार अनोळखी व्यक्तींनी आडवले.
तु इथे राहायचे नाही, तु तुझ्या बायकोला घेऊन येथुन निघून जा असे सांगितले होते.
मात्र तु इथुन निघून का गेला नाही असे म्हणून फिर्यादी यांना शिवीगाळ करुन लाकडी दांडक्याने डोक्यात,
हातापायावर मारहाण केली. फिर्यादी खाली पडले असता लाथाबुक्क्यांनी व दांडक्याने मारहाण केली.
यामध्ये फिर्यादी यांचा डावा हात फ्रॅक्चर झाला. तर डोक्याला व शरीरावर गंभीर दुखापत होऊन जखमी झाले.
याबाबत फिर्यादी यांनी चाकण पोलिसांकडे तक्रार दिली.
पोलिसांनी आरोपी निष्पन्न करुन त्यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar | “माझा दोष फक्त इतकाच आहे की…” अजित पवारांनी जारी केला व्हिडिओ संदेश; जाणून घ्या
Mahavikas Aghadi | ‘आघाडी सरकार आले, तर महिलांना एक लाख’; पृथ्वीराज चव्हाणांनी केलं जाहीर