Pune Crime News | पिंपरी: दुचाकीस्वाराला मारहाण, मुजोर रिक्षाचालकाच्या आवळल्या मुसक्या
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | अचानक रिक्षा का थांबवली, अशी विचारणा केली असता रिक्षाचालकाने दोन जणांना बेदम मारहाण करुन जखमी केले. मारहाण करुन पळून गेलेल्या रिक्षा चालकाचा शोध घेऊन चाकण पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना रविवारी (दि.14) सायंकाळी आठच्या सुमारास चाकण येथील मच्छी मार्केट (Chakan Fish Market) येथे घडली.
याबाबत तुषार सुरेश पिसाळ (वय-38 रा. बगाडे वस्ती, कुरुळी ता. हवेली) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार प्रथमेश उर्फ सोन्या राजेंद्र मोरे (वय-23 रा. कडाचीवाडी, चाकण, ता. खेड) याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 118(1), 352, 351(2) सह क्रिमिनल लॉ अमेंटमेंट अॅक्ट, मोटार वाहन कायदा 185 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुषार हे चाकण येथील मासे विक्री मार्केटपासून दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी आरोपी मोरे याने अचानक रिक्षा फिर्यादी यांच्या दुचाकी समोर आणून थांबवली. याबाबत तुषार याने जाब विचारला असता आरोपी मोरे याने फिर्यादी तुषार व त्यांच्या मित्राला हातातील कड्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. तसेच परिसरात दहशत निर्माण केली. याबाबत तुषार पिसाळ यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (Pune Crime News)
तरुणावर कोयत्याने वार
पिंपरी : दारु पिण्यास 50 रुपये देण्यास नकार दिल्याने तरुणाच्या मानेवर कोयत्याने वार करुन
जखमी केल्याची घटना पिंपरी येथील बौद्धनगर येथे घडली आहे.
ही घटना 11 जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली आहे.
याबाबत राहुल गौतम जाधव (वय-29 रा. बौद्धनगर, पिंपरी) याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यावरुन संतोष अशोक घायतडक (वय-45 रा. पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Monsoon Rain | पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
Yerawada Jail News | येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी फरार