Pune Crime News | पिंपरी : प्रियकराला प्रेयसी व तीच्या मित्राने दगडाने ठेचले, एकाला अटक
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. पती व मुलांना सोडून राहण्यास बोलवल्याचा राग प्रेयसीला आल्याने तिने मित्राच्या मदतीने प्रियकराला दगडाने ठेचून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार चिखली परिसरात रविवारी (दि.7) दुपारी दीडच्या सुमारास जाधववाडी (Jadhavwadi Chikhali) येथील कच्चा रस्त्यावर घडला. याप्रकरणी चिखली पोलिसांनी (Chikhali Police Station) दोघांवर गुन्हा दाखल करुन एकाला अटक केली आहे. (Attempt To Murder)
अब्दुलकमाल शेख असे जखमी झालेल्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ हबीब अब्दुला शेख (वय-36 रा. जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अब्दुलकलाम याची प्रेयसी (वय-34 रा. चिखली) आणि तिचा मित्र प्रेमदास विठ्ठल चव्हाण (वय-28 रा. राममंदीर पाटील नगर, चिखली) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 109, 115(2), 352, 351(3), 3(5) नुसार गुन्हा दाखल केला असून प्रेमदास चव्हाण याला अटक केली आहे. (Attempt To Kill)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ अब्दुलकलाम आणि आरोपी महिलेचे प्रेमसंबंध आहेत. ‘तू तुझ्या पती व मुलांना सोडून माझ्याजवळ राहण्यास ये’ असे तो तिच्याकडे वारंवार तगादा लावत होता. यावरून दोघांमध्ये सतत वाद होत होते. हा वाद विकोपाला गेल्याने तिन तिच्या मित्राला याबाबत सांगितले. (Pune Crime News)
प्रेयसी व तिच्या मित्राने जाधवाडी येथील वडाचा मळा येथील कच्चा रस्त्यावर अब्दुलकलाम याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दगडाने डोक्यात मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न करुन गंभीर जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी फिर्यादी व त्यांचे मित्र गेले असता आरोपींनी तुम्ही जर मध्ये आला तर तुम्हाला पण मारुन टाकू अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Hit & Run Case | पुणे हिट अँड रन: ऑनड्युटी असलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना उडवलं,
एकाचा मृत्यू तर एक गंभीर
Rain In Lonavala Khandala | लोणावळा, खंडाळ्यात संततधार; पाऊस, धुके अन् पर्यटकांची गर्दी
Sharad Pawar On Devendra Fadnavis | “फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला पण आता…”
शरद पवारांचे मोठे विधान