Pune Crime News | पिंपरी: घरफोडी करणारी टोळी चिखली पोलिसांकडून गजाआड, साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त

Chikhali Police

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरात घरफोड्या करणाऱ्या टोळीला (House Burglary) चिखली पोलिसांनी अटक (Chikhali Police Station) केली आहे. पोलिसांनी तीन जणांना अटक करुन 4 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन चिखली पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी परिसरातील 100 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. (Gang Arrested In House Burglary)

आदर्श दयानंद मोरे (वय-25 रा. विठ्ठलवाडी, देहुगाव, पुणे), आनंद पोपट गादेकर (वय-34 रा. अवधुत सोसायटी, पिंगळे चौक, चिखली), प्रदिप दिलीप तांबोळी (वय-25 रा. भाटे वस्ती, तळवडे गाव, पुणे) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाडो फॅक्स टेक्नॉलॉजी प्रा. लि. या कुरिअर कंपनीचे मोरेवस्ती चिखली येथे ऑफिस आहे. याठिकाणी 1 जुलै रोजी रात्री साडे बारा ते पहाटे साडे पाच या दरम्यान ऑफिसचे शटर उचकटून चोरट्यांनी कपाटातील एक लाख 7 हजार रुपयांची रोकड, डी.व्ही.आर मशीन चोरून नेले. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना 6 जुलै रोजी तळवडे येथील डिलेवरी लिमीटेड कंपनीच्या कार्यालयाचे शटर उचकटून कपाटातील 1 लाख 3 हजार रुपयांची रोकड, कुरिअर पार्सल असा एकूण 1 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याबाबत चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही गुन्ह्यातील आरोपींची चोरी करण्याची पद्धत पाहून आरोपी एकच असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने घटनास्थळ परिसरातील येणाऱ्या -जाणाऱ्या रस्त्यावरील 100 सीसीटीव्ही तपासून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 1 लाख 19 हजार रुपये रोख, गुन्ह्यात वापरलेली चारचाकी, दुचाकी असा एकूण 4 लाख 39 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (Pune Crime News)

ही कामगिरी पोलीस उपायुक्त शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त संदीप हिरे
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक राजेश मासाळ,
पोलीस अंमलदार संदीप मासाळ, सुनील शिंदे, अमोल साकोरे, चेतन सावंत, बाबा गर्जे, दिपक मोहिते,
सुरज सुतार, कबीर पिंजारी, संदीप राठोड, गौतम सातपुते, संतोष भोर, संतोष सकपाळ यांच्या पथकाने केली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Reliance Retail | अनंतच्या विवाहापूर्वी नवीन बिझनेस सुरू करण्याची तयारी,
‘या’ व्यवसायात एंट्री करणार मुकेश अंबानी, चीनची कंपनी आणणार भारतात

Pune Crime News | पुणे: गाडीत बसण्यास नकार दिल्याने अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन, एकाला अटक

Gautam Gambhir | गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाहांची घोषणा

Pune Bopodi Hit & Run Case | पुणे पोलीस हवालदार मृत्यू प्रकरण : कारमधील तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात,
कारला ओव्हरटेक केल्याचा आला राग, भरधाव वेगात कार चालवली अन्…

You may have missed