Pune Crime News | पिंपरी: बीव्हीजी डेव्हलपर्सची 7 कोटींची फसवणूक, बिल्डरसह चार जणांवर FIR
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | बनावट कागदपत्रे (Fake Documents) तयार करुन त्याद्वारे बीव्हीजी डेव्हलपर्स च्या (BVG Developers) मुदत कर्ज खात्यातून दहा कोटी रुपये परस्पर काढून घेतले. त्यापैकी एका आरोपीने तीन कोटी 20 लाख रुपये परत केले. मात्र, उर्वरित 6 कोटी 94 लाख 18 हजार रुपये परत न करता इतर आरोपींनी आर्थिक फसवणूक केली (Cheating Fraud Case). हा प्रकार 25 ऑक्टोबर 2019 ते 18 जानेवारी या कालावधीत स्टेट बँक ऑफ इंडिया औद्योगिक वित्त शाखा वल्लभनगर येथे घडला आहे.
याबाबत बिभिषण व्यंकटराव गायकवाड (वय-53 रा. निगडी प्राधीकरण) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात (Bhosari Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बँकेचे रिलेशनशिप मॅनेजर शाहबाज जफर सय्यद मोहमंद जफर Shahbaz Zafar Syed Mohmand Zafar (रा. लोढा, गहूंजे ता. मावळ), बांधकाम व्यावसायिक विजय अरविंद रायकर Vijay Arvind Raikar (वय-46 रा. सुमेरु बंगलो, माणिक बाग, सिंहगड रोड, पुणे), बांधकाम व्यावसायिक गौरव सुनिल सोमाणी Gaurav Sunil Somani (वय-35 रा. सोबा सवेरा, बिबवेवाडी, पुणे), महेश भगवानराव नलावडे Mahesh Bhagwanrao Nalavde (पत्ता माहित नाही) यांच्यावर आयपीसी 420, 409, 467, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शाहबाज जफर आणि विजय रायकर हे स्टेट बँक ऑफ इंडीया, औद्योगिक वित्त शाखा वल्लभनगर येथे रिलेशनशिप मॅनेजर या पदावर काम करतात. त्यांनी पदाचा गैरवापर करुन गौरव सोमाणी व महेश नलावडे यांच्यासोबत संगनमत करुन बीव्हीजी डेव्हलपर्सच्या नावाचे बनावट विनंतीपत्र तयार केले. त्या पत्रावर फिर्यादी व त्यांचा भाऊ भागीदार बाळासाहेब गायकवाड यांच्या बनावट सह्या केल्या. या पत्राच्या आधारे बीव्हीजी डेव्हलपर्स या भगीदारी संस्थेचे मंजूर मुदतकर्ज खात्यातून वेळोवेळी 10 कोटी 14 लाख 18 हजार रुपये फिर्यादी यांच्या संमतीशिवाय काढून घेत वेगवेगळ्या फर्मच्या खात्यावर वळते केले.
तसेच आरोपींनी फसवणूकीचा उद्देश साध्य होण्यासाठी फिर्यादी यांच्या लोन खात्याचे बनावट बँक स्टेटमेंट तयार करुन
त्यावर बँकेचा शिक्का मारुन ते फिर्यादी यांना दिले.
दरम्यान, फसवणुकीचा प्रकार फिर्य़ादी यांच्या लक्षात आल्यानंतर आरोपींनी पैसे परत करण्याचे वेळोवेळी आश्वासन दिले.
आरोपी पैकी विजय रायकर याने 3 कोटी 20 लाख रुपये फिर्यादी यांना परत केले.
मात्र, इतर आरोपींनी 6 कोटी 94 लाख 18 हजार रुपये परत न करता बीव्हीजी डेव्हलपर्स ची आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे.
पुढील तपास भोसरी पोलीस करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड