Pune Crime News | पिंपरी: शेतात जनावरे चरण्यास सोडण्यावरुन हाणामारी, परस्पर विरोधी गुन्हे दाखल; दोघांना अटक
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | पडीक शेतात जनावरे चरण्यासाठी सोडल्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी (Mahalunge MIDC Police Station) परस्पर विरोधी गुन्हे दाखल करुन दोघांना अटक केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.15) सकाळी साडे दहाच्या सुमारास हेद्रुज गावच्या हद्दीत तोरणे फाट्याजवळील ज्ञानेश्वर बच्चे यांच्या पडिक शेतात घडली.
अनिल सन्तु बच्चे (वय-42 रा. हेद्रुज, तोरणे फाट्याजवळ, ता. खेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन प्रशांत उर्फ गोट्या भिकाजी बच्चे, भिकाजी तात्याबा बच्चे, दिपक भिकाजी बच्चे (सर्व रा. हेद्रुज ता. खेड) यांच्यावर भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352,3(5) नुसार गुन्हा दाखल करुन प्रशांत उर्फ गोट्या बच्चे याला अटक केली आहे.
फिर्यादी अनिल बच्चे यांनी ज्ञानेश्वर बच्चे यांच्या पडिक शेत जनावरांना चरण्यासाठी घेतले आहे. त्या शेतात आरोपींनी त्यांची जनावरे चरण्यासाठी सोडली. याबाबत विचारणा केली केली असता आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांना शिवागाळ करुन काठीने व लाथाबुक्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले.
याच्या परस्पर विरोधात प्रशांत भिकाजी बच्चे (वय-30 रा. हेंद्रुज ता. खेड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गणेश अनिल बच्चे,
अनिल संतु बच्चे (वय-42 दोघे रा. हेंद्रुज ता. खेड) यांच्यावर गुन्हा दाखल करुन गणेश अनिल बच्चे याला अटक केली आहे.
फिर्यादी यांनी त्यांची जनावरे ज्ञानेश्वर बच्चे यांच्या शेतात चरण्यासाठी सोडली होती.
आरोपींनी प्रशांत यांना शिवीगाळ करुन दगडाने मारहाण केली. दोन्ही गुन्ह्याचा तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
ACB Trap On Policeman (ASI) | लाच घेताना सहायक पोलीस उपनिरीक्षक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
Pune Crime News | पुणे: खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक