Pune Crime News | पिंपरी: बनावट सोने तारण ठेवून 10 लाखांचे कर्ज, बँकेची फसवणूक करणाऱ्या 6 जणांवर FIR

Fraud

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | बनावट सोने खरे असल्याचे भासवून क्रेडीट सोसायटीत तारण ठेवून दहा लाख 42 हजार रुपयांचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे (Cheating Fraud Case). याप्रकरणी सोने तपासणी करणाऱ्या सराफासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 18 मार्च 2023 ते 15 मार्च 2024 या कालावधीत बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीच्या (Buldana Urban Co-op. Credit Society Ltd.) काळेवाडी शाखेत घडला आहे.

याबाबत बँकेच्या अधिकारी मनिषा गणेश साळवी (वय-43 रा. विशालनगार, जगताप डेअरी, पिंपळे निलख) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सोने तपासणारा सचिन काकासाहेब पिंपरीकर (वय-45 रा. तापकीर नगर, काळेवाडी), अनुसया गोविंद भदाडे (वय-32 रा. ज्योतीबा कॉलनी, काळेवाडी), दिलीप महादेव धारिया (वय-69 रा. अमरदीप कॉलनी, श्रीनगर, रहाटणी), मंदा दत्तात्रय थोरात (वय-40 रा. एकता कॉलनी, थेरगाव), सुनिता दिलीप रकसाळे (वय-44 रा. शिवराज कॉलनी, थेरगाव) यांच्यावर आयपीसी 409, 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीच्या काळेवाडी शाखेत कार्यरत आहेत. तर आरोपी सचिन पिंपरीकर सोने तपासणीस म्हणून काम करतो. त्याने इतर आरोपींसोबत संगनमत करुन त्यांचे 35.03 तोळे वजनाचे बनावट सोन्याचे दागिने हे खरे असल्याचे भासवले. आरोपींनी खोटे सोने फिर्यादी काम करत असलेल्या बुलढाणा अर्बन को ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीच्या काळेवाडी शाखेत तारण ठेवून 10 लाख 42 हजार रुपये कर्ज घेऊन फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pune Hit & Run Case | पुणे हिट अँड रन: ऑनड्युटी असलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना उडवलं,
एकाचा मृत्यू तर एक गंभीर

Rain In Lonavala Khandala | लोणावळा, खंडाळ्यात संततधार; पाऊस, धुके अन् पर्यटकांची गर्दी

Sharad Pawar On Devendra Fadnavis | “फडणवीसांचा सुरुवातीचा काळ मला चांगला वाटला पण आता…”
शरद पवारांचे मोठे विधान

You may have missed