Pune Crime News | पिंपरी : ‘मी गाववाला, निघून जा नाहीतर…’ इंडिकेटर लावण्यास सांगितल्याने रॉडने मारहाण
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | गाडी वळवताना इंडिकेटर लावले नसल्याने चालकाला इंडिकेटर लावण्यास सांगितले. याचा राग आल्याने ‘मी येथील गाववाला तापकीर आहे, येथून निघून जा नाहीतर मर्डर करेन’ अशी धमकी देऊन एका व्यक्तीला लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. ही घटना सोमवारी (दि.8) रात्री नऊच्या सुमारास चऱ्होली बुद्रुक (Charholi Budruk) भागातील वडमुखवाडी (Wadmukhwadi) येथील अलंकापुरम रोडवर (Alankapuram Road Pune) घडली.
याबाबत जखमी प्रशांत दत्तात्रय गिलबिले (वय-44 रा. वडमुखवाडी, चऱ्होली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन शुभम दशरथ तापकीर (रा. काळे भिंत, चऱ्होली बुद्रुक) याच्यावर भान्यासं 118(1), 115(2), 352, 351(2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी हे अलंकापुरम रोडवरील रविकिरण सोसायटीत आले असता आरोपी चऱ्होलीकडून टेम्पो घेऊन सोसायटीत आला. मात्र, त्याने उजवीकडे वळताना इंडिकेटर लावले नव्हते. त्यामुळे गिलबिले यांनी शुभम तापकीर याला गाडीचे इंडिकेटर लाव असे सांगितले. याचा राग आल्याने त्याने ‘मी येथील गाववाला तापकीर आहे’ असे म्हणून गिलबिले यांना अश्लील शिवीगाळ केली.
तसचे ‘तू इथून निघून जा नाहीतर मी तुझा मर्डर करेन’ अशी धमकी देऊन हाताने मारहाण केली.
फिर्यादी खाली पडल्यानंतर आरोपीने टेम्पो मधून लोखंडी रॉड काढून फिर्यादी यांच्या पायावर मारला.
तसेच डोक्यात रॉड मारुन गंभीर जखमी केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Reliance Retail | अनंतच्या विवाहापूर्वी नवीन बिझनेस सुरू करण्याची तयारी,
‘या’ व्यवसायात एंट्री करणार मुकेश अंबानी, चीनची कंपनी आणणार भारतात
Pune Crime News | पुणे: गाडीत बसण्यास नकार दिल्याने अश्लील शिवीगाळ करुन असभ्य वर्तन, एकाला अटक
Gautam Gambhir | गौतम गंभीर भारतीय क्रिकेट संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक, जय शाहांची घोषणा
Pune Bopodi Hit & Run Case | पुणे पोलीस हवालदार मृत्यू प्रकरण : कारमधील तिघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात,
कारला ओव्हरटेक केल्याचा आला राग, भरधाव वेगात कार चालवली अन्…