Pune Crime News | पिंपरी: 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नाराधमाला 22 वर्षांची सक्तमजुरी

court dhandhuka

पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | मी तुझ्यावर खूप प्रेम करतो असे म्हणत चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार (Rape Case) करणाऱ्या तरुणाला न्यायालयाने 22 वर्षे सक्तमजुरी आणि 14 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम मुलीच्या पुनर्वसनासाठी देण्यात यावी. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने मनोधैर्य योजनेअंतर्गत मुलींना योग्य ती मदत करावी, असे आदेशात नमूद केले आहे. विशेष न्यायाधीश एस.बी. राठोड (Judge M.B. Rathod) यांनी हा निकाल दिला आहे.

अमोल लक्ष्मण वाघमारे (वय-30 रा. थेरगाव) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी मुलीच्या आईने वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली होती. हा प्रकार 2019 ते फेब्रुवारी 2020 दरम्यान थेरगाव (Thergaon) येथे घडला होता. पीडित मुलीची आई धुणीभांडी करण्याचे काम करते. कामानिमित्त त्या घराबाहेर पडल्या नंतर आरोपी घरी येत होता. त्याने सुरुवातीला मुलीला मी तुझ्यावर खूप प्रेम करतो असे म्हणत तिच्यावर अत्याचार केला. 2019 ते फेब्रुवारी 2020 दरम्यान हा प्रकार सुरु होता.

दरम्यान, फिर्यादी यांच्या घराजवळ राहणाऱ्या महिलेने त्यांना सांगितले की, तुम्ही कामाला बाहेर पडल्यानंतर वाघमारे हा तुमच्या घरात जातो. याबाबत फिर्य़ादी यांन मुलीकडे विचारणा केली असता तिने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. त्यानंतर फिर्य़ादी यांनी अमोल वाघमारे याच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक सपना देवतळे (API Sapna Deotale) यांनी केला.

या खटल्यामध्ये सरकारी वकील सुप्रिया मोरे-देसाई (Adv Supriya More Desai) यांनी काम पाहिले.
वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर (Sr PI Nivritti Kolhatkar) आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) रवीकुमार नाळे (PI Ravikumar Nale)
यांनी प्रभारी अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. न्यायालयीन कामकाजासाठी कोर्ट पैरवी कर्मचारी डी. एस. पांडुळे यांनी मदत केली.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

PMC Solid Waste Management Dept | पुणे: कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी मर्जीतील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर घुसवण्यासाठी घनकचरा विभागाचा ‘वरिष्ठां’वर दबाव

Pune Crime News | पुणे : व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आयटी तरुणाची आत्महत्या

Supriya Sule On Amit Shah | “शरद पवार भ्रष्टाचाराचे म्होरके”, अमित शहांच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

Shivsena UBT On Amit Shah | ‘आम्ही तुमच्यासारखे जिना फॅन्स क्लबचे सदस्य नाही’; अमित शहांच्या टीकेवर ठाकरे गटाचे प्रत्युत्तर