Pune Crime News | पिंपरी: कोयत्याने वाहनांची तोडफोड करुन चालकाला लुटले, रहाटणी येथील घटना
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | लोखंडी कोयत्याने वाहनांची तोडफोड करुन चालकाच्या खिशातून जबरदस्तीने पैसे काढून घेतले. तसेच मोठ मोठ्या आरडा ओरडा करुन आम्ही इथले भाई आहोत असे म्हणून हातातील कोयते हवेत फिरवून दहशत पसरवली. हा प्रकार रविवारी (दि.14) मध्यरात्री दीडच्या सुमारास रहाटणी येथील कौतीक हॉटेल समोरील सार्वजनिक रोडवर घडला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी (Wakad Police Station) तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत कारचालक बाळु लक्ष्मण केदारी (वय-37 रा. रामनगर कॉलनी, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विकास रंगनाथ खरात (वय-20), दिशान उर्फ बंटी दिपक साळवे (वय-19 दोघे रा. भालेराव कॉलनी, रामनगर, रहाटणी), रितेश (वय-21 पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर भारतीय न्याय संहिता 309 (4), 3(5), 115(2), 324(4), 351 (2)(3) सह आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फिर्यादी यांच्या तोंडओळखीचे आहेत. रविवारी रात्री दीडच्या सुमारास फिर्यादी कौतीक हॉटेलच्या समोरील सार्वजनिक रोडवर कार घेऊन थांबले होते. त्यावेळी आरोपी हातात लोखंडी कोयते घेऊन आले. त्यांनी फिर्यादी यांच्या चारचाकी गाडीवर तसेच इतर वाहनांवर कोयते मारुन तोडफोड केली. याचा जाब विचारला असता बंटी याने फिर्यादी यांची गचांडी पकडून म्हणाला, मी इथला भाई आहे, जास्त नाटक केली तर तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. (Pune Crime News)
तर इतर आरोपींनी फिर्यादी यांना पकडले असता बंटीने फिर्यादी यांच्या खिशातून जबरदस्तीने सातशे रुपये काढून घेतले.
तसेच फिर्यादी यांच्या कारच्या काचांवर कोयता मारुन नुकसान केले.
आरोपींनी हातातील कोयते हवेत फिरवून दहशत निर्माण केली.
आम्ही इथले भाई आहोत असे म्हणत दुचाकीवरुन रहाटणीच्या दिशेने निघून गेले.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अतुल जाधव करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Monsoon Rain | पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
Yerawada Jail News | येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी फरार