Pune Crime News | पिंपरी: ‘आम्ही या भागातले डॉन’ पिस्तुलाचा धाक दाखवून कापड व्यावसायिकाला लुटले
पिंपरी : Pune Pimpri Chinchwad Crime News | कपडे खरेदीसाठी आलेल्या तिघांनी ट्रायलसाठी कपडे घेतले. त्यानंतर पिस्तूलाचा धाक (Fear Of Pistol) दाखवून चार हजार रुपयांचे कपडे लुटल्याची घटना चिखली (Chikhali More Wasti) परिसरात घडली आहे. ही घटना चिखली मोरेवस्ती येथील रॉयल एस के मेन्स वेयर या दुकानामध्ये बुधवारी (दि.10) रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली.
याबाबत कापड दुकानदार प्रफुल्ल मधुकर कांबळे (वय-30 रा. मोरेवस्ती, चिखली, मुळ रा. लहुलव्हारा, ता. परांडा, जि. धाराशिव) यांनी चिखली पोलीस ठाण्यात (Chikhali Police Station) फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार तिघांवर भान्यसं कलम 309(4), 351(2)(3), 3(5), आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचे चिखली येथील अष्टविनायक चौकात रॉयल एस के मेन्स वेयर नावाचे कपड्याचे दुकान आहे. बुधवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास 20 ते 22 वयोगटातील तीन तरुण दुकानात आले. त्यांनी फिर्यादी यांना कपडे दाखवण्यास सांगितले. फिर्यादी यांनी दाखवलेले कपडे त्यांना पसंत पडल्याने एकजण कपडे घेऊन ट्रायल रुममध्ये गेला. शर्ट व पॅन्ट अंगात घातला. तर इतर दोघांनी कपडे पसंत करुन घेऊन पैसे देणार नसल्याचे सांगितले.
फिर्य़ादी यांनी तुम्हाला कपड्याचे पैसे द्यावे लागतील असे सांगितले असता आरोपीने कमरेला खोचलेले पिस्टल काढून फिर्यादीवर रोखली.
आता तुला खल्लास करून टाकतो. तुला पैसे मिळणार नाहीत. तुला आम्ही कोण आहोत हे माहिती नाही,
आम्ही नायर कॉलनीमध्ये मर्डर केला आहे. तुला कुठे जायचे तिथे जा. आम्ही या भागातले डॉन आहोत,
अशी धमकी देऊन चार हजार रुपयांचे कपडे पिस्टलचा धाक दाखवून घेऊन गेले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड