Pune Crime News | जीव वाचविणार्या पीएमपी चालकाच्या डोक्यात दगड घालून केले गंभीर जखमी, पर्वती पोलिसांनी दुचाकीस्वाराला केली अटक
पुणे : Pune Crime News | पुणे – सातारा रोडवरील बीआरटी मार्गातून जाणार्या पीएमपी बसला ओव्हरटेक करुन दुचाकीस्वार जात होता. त्याचवेळी समोरुन दुसरी पीएमपी बस आली. त्या बसचालकाने ब्रेक दाबून दुचाकीस्वाराचे प्राण वाचविले. त्याचे आभार मानायचे सोडून दुचाकीस्वाराने त्याच्या डोक्यात दगड घालून जखमी केले. पर्वती पोलिसांनी दुचाकीस्वाराला अटक केली आहे.
याप्रकरणी बसचालक सुरेश विठ्ठल गुंठे (वय ४०, रा. कात्रजगाव) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार मन्सूर गफूर शेख Mansoor Ghafoor Shaikh (वय २४, रा. झांबरे वस्ती, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याला अटक केली आहे. ही घटना लक्ष्मीनारायण चित्रपटगृहाजवळ बीआरटी मार्गावर १४ मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा रोडवरील बीआरटी मार्गावरुन बस स्वारगेट कडे येत होती. त्यावेळी तिच्या मागाहून दुचाकीस्वार मन्सूर शेख हा या बसला ओव्हरटेक करत होता. त्याचवेळी समोरुन दुसरी बस आली. दुचाकीस्वाराला पाहून बसचालक सुरेश गुंठे यांनी बसला ब्रेक दाबून दुचाकीस्वाराला धडक बसण्यापासून वाचविले. आपला जीव बसचालकाने वाचविला, हे लक्षात न घेता़ मन्सूर शेख याने बससमोर दुचाकी उभी केली. तेव्हा बसचालक गुंठे हे खाली उतरले. तेव्हा मन्सूर शेख याने माझ्या अंगावर गाडी घालतो का असे म्हणून शिवीगाळ करुन त्यांच्या डोक्यात दगड घालून जखमी केले. त्यांच्या गळ्यातील चांदीची चैन व मोबाईल फोडून नुकसान केले. या घटनेची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे, सहायक पोलीस निरीक्षक नामदे हे घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी मन्सूर शेख याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक जगताप तपास करीत आहेत.
