Pune Crime News | पुणे : मुजोर पोलिसाची अन् पीएमपी चालकाची बसमध्ये जुंपली, व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसाला आली उपरती; 3 हजारात प्रकरण मिटलं

PMPML Bus Driver-Pune Policeman

पुणे : Koregaon Park Pune Crime News | बस कंडक्टर आणि ड्राव्हर सोबत प्रवाशी किंवा वाहन चालकांमध्ये होणारा वाद नेहमीचाच आहे. मात्र, काही वेळा हा वाद थेट पोलीस ठाण्यात पोहचतो. पुण्यात पोलिसाने (Pune Police) पीएमपीएमएल बसमध्ये (PMPML Bus) जाऊन बस चालकाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस शिपाई आणि पीएमटी बस चालक यांच्यात फ्रीस्टाईल हाणामारी झाली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याला याची उपरती आले. त्याने माफी मागून बसच्या ट्रिपचे झालेले तीन हजार रुपये नुकसान रोखीने भरुन यावर पडदा टाकला. मात्र, या घटनेमुळे पीएमपी कर्मचाऱ्यांनी पोलिसावर संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, पीएमटी चालक आणि पोलीस शिपाई या दोघांनीही सामोपचाराने हा वाद मिटवला. हा प्रकार कोरेगाव पार्क परिसरात घडला आहे.

पोलीस शिपाई आणि पीएमटीचा चालक यांच्यात बसमध्ये हाणामारी झाली. यावेळी वाहनचालक हा चालकाच्या सीटवर बसलेला दिसून येतो, तर पोलीस शिपाई त्याला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. या हाणामारीत दोघेही एकमेकांची कॉलर पकडून मारहाण करत असल्याचे दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाल्यावर दोघांनी हा वाद मिटवून घेतला. मात्र, पोलीस शिपायावर सोशल मीडियातून टीका केली जात आहे.

रविवारी सकाळी वाडिया महाविद्यालयापासून मार्ग क्रमांक सी 302 ही बस न. ता. वाडीकडे प्रवाशांना घेऊन निघाली होती. पीएमटी चालकाने गाडी चालवताना पोलीस शिपायाच्या दुचाकी जवळून चालवल्याचा आरोप पोलिसाने केला आहे. पोलिसाने त्याची दुचाकी बससमोर आडवी लावली. पोलीस कर्मचाऱ्याने दुचाकीवरून उतरून बसचालकाला शिवीगाळ केली. त्यावरुन दोघांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर पोलीस कर्मचारी थेट बसमध्ये आला आणि त्याने पीएमटी बस चालाकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियातून पोलीस कर्मचाऱ्याच्या वर्तणुकीवर टीका केली आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर दोघांना उपरती सुचली असून पोलीस शिपायाने स्वत: पोलीस ठाण्यात अर्ज देत सामोपचाराने आमचं भांडण मिटलं असल्याचे म्हटलं आहे.

पोलीस कर्मचाऱ्याने मारहाण केल्यानंतर पीएमटी बस चालकाने कोरेगाव पोर्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडे अर्ज केला आहे.
त्यानुसार 21 जुलै 2024 वार रविवार रोजी माझा व पीएमटी चालक यांच्याशी माझे किरकोळ वाद झाला होता.
सदर इसम चालक भागवत तोरणे व मी स्वत: पोलीस स्टेशन या ठिकाणी गेलो असता त्या ठिकाणी आमच्यात सदर तक्रारीबाबत समजुतीने वाद मिटवण्यात आला आहे. तरी सदर व्यक्तीबाबत माझी कोणतीही तक्रार नाही.
त्यांचा पीएमपटी चे ट्रिपचे नुकसान झाले असे त्यांचे म्हणने आहे, त्यानुसार मी तीन हजार रुपये रोखीने भरले आहेत,
असा जबाब पोलीस शिपाई आर.ए. वाघमारे यांनी लिहून दिला आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

PMC Solid Waste Management Dept | पुणे: कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी मर्जीतील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर घुसवण्यासाठी घनकचरा विभागाचा ‘वरिष्ठां’वर दबाव

Pune Crime News | पुणे : व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आयटी तरुणाची आत्महत्या

Supriya Sule On Amit Shah | “शरद पवार भ्रष्टाचाराचे म्होरके”, अमित शहांच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

Shivsena UBT On Amit Shah | ‘आम्ही तुमच्यासारखे जिना फॅन्स क्लबचे सदस्य नाही’; अमित शहांच्या टीकेवर ठाकरे गटाचे प्रत्युत्तर

You may have missed