Pune Crime News | मतमोजणी दरम्यान ध्वनी प्रदुषण करणार्या 19 बुलेट राजावर पोलिसांची कारवाई
पुणे : Pune Crime News | मतमोजणी दरम्यान काही उमेदवारांसोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक मोटारसायकलच्या सायलेंसरमध्ये अनधिकृत बदल करुन ध्वनी प्रदुषण करणारा मोठा व कर्कश आवाज निर्माण केला. तसेच कर्कश हॉर्न वाजवून सार्वजनिक शांतताभंग करण्याचा प्रयत्न केला. पोलीस बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी व अंमलदारांनी तात्काळ अशा १९ बुलेट, यामाहा मोटारसायकली ताब्यात घेतल्या. त्यांच्यावर कारवाई केली. त्यांच्याकडून ९६ हजार ७०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
वाहनांमध्ये बेकायदेशीर बदल करणे, कर्कश हॉर्नचा वापर करणे अथवा सार्वजनिक शांततेस बाधा आणणारे कृत्य करु नये, असे पोलिसांनी तरुणांना आवाहन केले आहे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक निलेश जगदाळे यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, पोलीस अंमलदार दीपक कांबळे, भाऊसाहेब खटके, निलेश किरवे, बापू लोणकर, भगवान हंबर्डे, अनिरुद्ध सोनवणे, अजित मदने, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलिक केसकर, महावीर लोंढे, आकाश धावडे, विजय कानेकर, धीरज शेलार यांनी केली आहे.
