Pune Crime News | प्रेमसंबधाचे फोटो भावी पतीला पाठवून लग्न मोडणार्‍या प्रियकराला पोलिसांनी केली अटक; तरुणीच्या घरातील चौघांपैकी एकाचा मर्डर करण्याची दिली धमकी

Pune Crime News

पुणे : Pune Crime News | लग्न जमल्याने तिने त्याच्या बरोबरचे ४ वर्षापासूनचे  प्रेमसंबंध तोडल्याने चिडलेल्या प्रियकराने त्यांचे प्रेमसंबंध असल्याचे फोटो भावी पतीला व त्यांच्या घरातील लोकांना दाखवून लग्न मोडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लक्ष्मीनगर पोलिसांनी या  प्रियकराला अटक केली आहे.

इम्रान रहिमान शेख (वय २२, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका २१ वर्षाच्या तरुणीने लक्ष्मीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३० व ३१ जानेवारी २०२६ दरम्यान घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि इम्रान शेख यांचे ४ वर्षे प्रेमसंबंध होते. फिर्यादी यांचे लग्न जमले असल्याने त्यांनी माझ्यासोबत कोणताही संबंध व संपर्क ठेवू नको, माझे लग्न जमले आहे, असे त्याला सांगितले. तेव्हा ४ वर्ष प्रेमसंबंध असल्याचा फायदा घेऊन इम्रान शेख याने तिला सांगण्यास लाज वाटेल, अशा अश्लिल भाषेत बोलून तुझे लग्न जमू देणार नाही, अशी धमकी दिली. तसेच त्याने फिर्यादी यांच्या आईला लोखंडी हत्यार दाखवून तुमच्या चौघांपैकी एकाचा मर्डर करतो, अशी धमकी दिली. त्यानंतर ज्याच्याशी फिर्यादीचे लग्न ठरले होते. त्या भावी पतीला व त्याच्या घरातील लोकांना इम्रान शेख याने तिच्यासोबत असलेले त्याचे प्रेमसंबंधाबाबतचे फोटो दाखवून तिचे लग्न मोडले. लक्ष्मीनगर पोलिसांनी इम्रान शेख याला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करीत आहेत.

You may have missed