Pune Crime News | ‘शार्प शुटर’ ला सुपारी देऊन आखलेला खुनाचा कट पोलिसांनी उधळला; गुंडाने त्याच्यावरील खुनाचा प्रयत्न केल्याचा बदला घेण्यापूर्वीच त्याचा खातमा करण्याचा आखला होता कट

Pune Crime News | Police foil murder plot by giving ‘sharp shooter’ betel nut; The goon had planned to eliminate him before he could avenge the attempted murder on him

पुणे : Pune Crime News | हत्याराने मारहाण केल्याप्रकरणात आॅक्टोबर २०२४ मध्ये पर्वती पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात जखमी झालेला गुंड त्याच्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेऊ शकतो, असे वाटल्याने त्याने बदला घेण्याअगोदरच त्याला संपविण्याचा कट आखण्यात आला होता. त्यासाठी त्यांनी शार्प शुटरला पिस्तुलही पुरविले होते. खंडणीविरोधी पथकाला याची कुणकुण लागली़ त्यांनी या शार्प शुटरला उचलले़ त्यातून एक संभाव्य खुनाची घटना टाळण्यात पोलिसांना यश आले आहे.

चेतन ऊर्फ बाळ्या सिद्धनाथ जाधव Chetan alias Balia Siddhnath Jadhav (वय २६, रा. दांडेकर पुल) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याबरोबर खुनाचा कट रचणारे सिंधु धोत्रे ऊर्फ आक्का, अमन झरेकर याची आई सिन्नु झरेकर, गणेश रेणुसे याची आई पिंकी रेणुसे, गणेश रेणुसे, अमन झरेकर (सर्व रा. महालक्ष्मी बिल्डिंग, सिंहगड रोड, दत्तवाडी), सुमित माने (रा. हडपसर), निशांत राऊत (रा. अप्पर बिबवेवाडी), बापू कांबळे (रा. अप्पर बिबवेवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष ऊर्फ भावड्या साळुंखे याच्यावर धारदार हत्याराने वार करुन त्याला जखमी करण्यात आले होते. आॅक्टोंबर २०२४ मध्ये घडलेल्या या गुन्ह्यात पर्वती पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्ह्यात गणेश रेणुसे, आकाश म्हस्के, तेजस नायर, रोहित खडके, भैय्या पालखे व इतर ४ आरोपी आहेत. या गुन्ह्यातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यांच्यातील गणेश रेणुसे हा सध्या जामीनावर बाहेर आला आहे. संतोष ऊर्फ भावड्या सांळुखे हा त्याच्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेऊ शकतो, असे गणेश रेणुसे याच्या नातेवाईकांना वाटले. संतोष साळुंखे याने गणेशला मारण्याच्या अगोदरच संतोषचा खातमा करण्याच्या उद्देशाने त्यांनी एक पिस्टल आणले. ते चेतन जाधव याला दिले होते.

गुन्हे शाखेतील खंडणी विरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे व पोलीस अंमलदार पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदा सचिन माळवे व अमर पवार यांना त्यांच्या बातमीदाराकडून ही माहिती मिळाली.

या माहितीनुसार पोलिसांनी शोध मोहिम राबवुन दांडेकर पुल परिसरातून चेतन जाधव याला मांगीरबाबा चौक येथून ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १ गावठी पिस्टल व त्याचे मॅगिजनमध्ये २ जिवंत काडतुसे असा ३५ हजार ४०० रुपयांचा माल जप्त केला.

त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने सांगितले की, गणेश रेणुसे हा नुकताच मोक्का गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आला आहे. भावड्या साळुंखे या चा प्रभाव दांडेकर पुल परिसरात वाढला आहे. त्यामुळे त्याच्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेऊन तो गणेश रेणुसेवर हल्ला करण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे गणेश रेणुसे याच्या नातेवाईकांनी भावड्याचाच खुन करायचे ठरवले आहे. तसेच सिंधु ऊर्फ आक्का धोत्र हिचा मुलगा सचिन धोत्रे याची ७ वर्षे पत्नी असलेली महिला हिच्या सोबतही भावड्या साळुंखे याने अनैतिक संबंध ठेवून त्याच्यापासून तिला २ मुले झाली. त्यामुळे परिसरामध्ये नाचक्की झाली होती. त्याचा बदला सिंधु चा दुसरा मुलगा अमित धोत्रे घेणार होता. परंतु, त्याचा ह्दयविकाराने मृत्यु झाल्याने त्याचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्याचा या आरोपींचा मानस होता, असे त्याने सांगितले. त्यासाठी त्यांनी पिस्तुल उपलब्ध केले. स्वत: वेगळे राहून एका सराईत गुन्हेगाराच्या मदतीने भावड्याचा खुन घडवुन आणण्याचे ठरवले होते. काम झाल्यानंतर त्याला योग्य ती रक्कम देण्याचे ठरवले होते.

खंडणी विरोधी पथकाने अगोदरच गुन्हेगाराला पकडल्याने एक खुनाचा कट उधळला गेला. संभाव्य रक्तपात टाळला आहे.

आरोपींचे रेकॉर्ड

चेतन ऊर्फ बाळ्या सिद्धनाथ जाधव याच्यावर पर्वती पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, वाहन तोडफोड व आर्म अ‍ॅक्टचे २ गुन्हे दाखल आहेत. अमन झारेकरी याच्यावर पर्वती पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरोडा, आर्म अ‍ॅक्टचे ५ गुन्हे व सिंहगड रोड पोलीस ठाण्यात १ गुन्हा दाखल आहे. गणेश दीपक रेणुसे याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात जबरी चोरी, पर्वती मध्ये खुनाचा प्रयत्न, मोक्का अन्वये गुन्हा दाखल आहे.

बापू शिवाजी कांबळे याच्यावर बिबवेवाडी पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा १ व दारुविक्रीचा १ गुन्हा दाखल आहे. बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यात बापू कांबळे याला २०१४ मध्ये जन्मठेपेची शिक्षा लागली आहे. तो २०२३ पासून हायकोर्ट आपिलावर बाहेर आहे. सिंधु हिरामण धोत्रे हिच्यावर पर्वती पोलीस ठाणे येथे दारुबंदी कायद्यानुसार ३ गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर पार्वे, पोलीस अंमलदार सचिन माळवे, दयानंद तेलंगे, अमोल आवाड, अमर पवार, नितीन कांबळे, दुर्योधन गुरव, रहिम शेख, रणजित फडतरे, प्रफुल्ल चव्हाण व राजेंद्र लांडगे यांनी केली आहे.

You may have missed