Pune Crime News | घरी येणार्या अल्पवयीन मुलाने चोरलेले 5 लाख 60 हजार रुपयांचे 73 ग्रॅम वजनाचे सोन्याची दागिने पोलिसांनी केले हस्तगत

पुणे : Pune Crime News | घरातील कपाटातून चोरीला गेलेले दागिने एका अल्पवयीन मुलाने चोरल्याचा संशय व्यक्त केला जात होता. भारती विद्यापीठ पोलिसांनी या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली. गुन्ह्यातील चोरीला गेलेले ५ लाख ६० हजार रुपयांचे ७३़५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. (Bharti Vidyapeeth Police)
याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एका ६४ वर्षाच्या नागरिकाने फिर्याद दिली होती. त्यांच्या घरातील कपाटाची चावी हरवली होती. ती सापडत नसल्याने त्यांनी नवीन चावी बनवून घेतली. कपाटातील सोन्याचे दागिने आढळून आले नाही. त्यांच्या घरी येणार्या एका अल्पवयीन मुलावर त्यांनी संशय व्यक्त केला होता.
पोलीस अंमलदार मंगेश पवार, महेश बारवकर, अभिनय चौधरी यांनी हा गुन्हा अल्पवयीन मुलाने केल्याचे निष्पन्न झाल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याने मित्राकडे दागिने ठेवायला दिले होते़ पोलिसांनी हे दागिने हस्तगत केले.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, सचिन गाडे, निलेश् खैरमोडे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, तुकाराम सुतार यांनी केली आहे.