Pune Crime News | लोणी काळभोरमधील हॉटेल जयश्रीमध्ये सुरु होता वेश्या व्यवसाय; हॉटेल मॅनेजर, वेटरला अटक करुन 2 महिलांची केली सुटका (Video)

Pune Crime News | Prostitution business was running in Hotel Jayashree in Loni Kalbhor; Hotel manager, waiter arrested and 2 women rescued (Video)

पुणे : Pune Crime News | पुणे -सोलापूर रोडवरील कवडीपाट टोलनाका येथील जयश्री एक्झिक्युटीव्ह रेस्टॉरंट बार अ‍ॅन्ड लॉजिंग  येथे लोणी काळभोर पोलिसांनी छापा टाकून वेश्या व्यवसाय सुरु असल्याचे उघड केले आहे. लॉजिंगच्या मॅनेजर व वेटरवर कारवाई करुन दोन महिलांची सुटका केली आहे.

https://www.instagram.com/reel/DSedVVfCbtv/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==

मॅनेजर मोहन कसनु राठोड (वय ५०, रा. साई बिल्डिंग, लोणी काळभोर) आणि वेटर गणेश दत्ता चिलकेवार (वय २५, रा. जयश्री लॉज स्टाफ रुम, लोणी काळभोर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ते कस्टमरकडून शारीरीक संबंध ठेवण्यासाठी तब्बल ५ हजार रुपये घेत होते.

पुणे – सोलापूर रोडवरील कवडीपाट टोलनाका येथील जयश्री एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट बार अ‍ॅन्ड लॉजिंग येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती खबर्‍यामार्फत लोणी काळभोर पोलिसांना मिळाली. त्यानुसार एक बनावट ग्राहक तयार करुन त्याला जयश्री हॉटेलवर पाठविण्यात आले. हॉटेलमधील मॅनेजर मोहन राठोड याच्याकडे महिलेची सर्व्हिसची मागणी केली. त्यावेळी मॅनेजरने होकार देऊन रुम भाडे दीड हजार रुपये घेऊन रुम नंबर २०१ मध्ये पाठविले. तसेच बनावट ग्राहकाकडून १०० रुपये घेऊन वेटर गणेश चिलकेवार याने कंडोम पाकिट पुरविले. त्यानंतर मोहन राठोड याने पिडित महिलेला बोलावून तिला रुम नंबर २०१ मध्ये ग्राहक असल्याचे सांगून पाठविले. 

या महिलेने मॅनेजरच्या सांगण्यावरुन २०१ रुममध्ये येऊन बनावट ग्राहकाला शारीरीक संबंध ठेवण्यासाठी ५ हजार रुपये चार्ज करीत असल्याचे सांगून ती तयार झाली. बनावट ग्राहकाने रेड पार्टीला कॉलद्वारे माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. तेथे २ महिलांकडून वेश्या व्यवसाय करवुन घेतला जात होता. या कारवाईत मोबाईल व इतर साहित्य असा ८४ हजार ४०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली.

ही कामगिरी परिमंडळ ६ चे पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे, सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, सहायक पोलीस निरीक्षक बाबर, हवालदार माने, सागर जगदाळे, पोलीस अंमलदार वनिता यादव, सोनवणे, कुंभार, मल्हार ढमढेरे यांनी केली आहे.

You may have missed