Pune Crime News | पुणे: वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून 17 वर्षाच्या मुलीकडे शरीरसुखाची मागणी; 22 वर्षाच्या तरुणाचे कृत्य

Molestation

पुणे: Pune Crime News | वाढदिवसानिमित्त अज्ञात ठिकाणी नेऊन वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून शरीरसुखाची मागणी केली (Demand Of Physical Relationship). त्याला नकार दिल्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग (Molestation Case) करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

याबाबत एका १७ वर्षाच्या मुलीने फरासखाना पोलीस ठाण्यात (Faraskhana Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी २२ वर्षाच्या तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १४ जुलै २०२४ रोजी घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्याने फिर्यादी मुलीला घरी घेऊन जातो, असे सांगून अज्ञात ठिकाणी बिल्डिंगच्या पार्किगमध्ये असलेल्या खोलीत नेले. तेथे आज माझा वाढदिवस आहे. तर मला तुझ्याकडून गिफ्ट पाहिजे, असे म्हणून तिच्याकडे शारीरीक सुखाची मागणी करु लागला.

तेव्हा फिर्यादीने त्यास नकार दिला. तेव्हा तिला मिठी मारुन तिचा विनयभंग केला. तसेच तुने इसके बारेमे किसको बताया, तो तेरा अब्बा मर जायेगा, अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक अमोल काळे (PSI Amol Kale) तपास करीत आहे.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj/

Follow puneriawaz.co.in :https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Khadki Pune Crime News | चालकाला मारहाण करुन कॅब नेली पळवून ! वाटेत दोन रिक्षा, कार, पादचार्‍याला दिली धडक

Maharashtra ACB News | भ्रष्टाचाराचे लोकांनाच काही पडले नाही ! लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे
तक्रारीचे प्रमाण 15 टक्क्यांनी घटले, अपसंपदा बाळगल्यांची 3168 कोटींची मालमत्ता जप्त

Katraj Kondhwa Road | कात्रज – कोंढवा रस्ता 84 मीटर रुंद करणार ! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
यांच्या आश्‍वासनानंतर पुणे महापालिकेकडून पाठपुरावा सुरू

Cultural Department Maharashtra | राष्ट्रवादीकडे सांस्कृतिक विभाग घेण्याची अजित पवार यांच्याकडे
कलावंतांच्या वतीने मंगेश मोरे यांची मागणी

You may have missed