Pune Crime News | पुणे : 30 वर्षीय पतीनेच सेक्स करण्यासाठी 50 वर्षीय मित्राला घरी आणले; पतीचा मित्र अश्लिल मेसेज करुन 25 वर्षीय विवाहितेचा करतोय विनयभंग

पुणे : Pune Crime News | सेक्स करण्यासाठी पतीच मित्राला घरी घेऊन आला. हा मित्र विवाहितेकडे एकटक पाहत बसला. तुझ्यासोबत सेक्स करुन तुला मुळबाळ करुन दे, असे तुझा पती सांगत असल्याचा मेसेज करुन व फोन करुन विवाहितेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत एका २५ वर्षाच्या विवाहितेने खडक पोलिसांकडे (Khadak Police) फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी तिचा पती (वय ३०) आणि त्याच्या मित्र (वय ५०) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना २१ जुलै २०२३ ते २ मार्च २०२५ दरम्यान सुरु होती.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विवाहिता हिचे पती तिला शिवीगाळ करुन मारहाण करत असत. एके दिवशी तिचा पती फिर्यादीसोबत सेक्स करण्यासाठी राहत्या घरी मित्राला घेऊन आला. त्यावेळी तो फिर्यादीकडे एकटक पाहून तिच्या एकांताचा भंग करत विनयभंग केला. त्याला त्यांनी विरोध केल. परंतु, कोणाकडे तक्रार केली नाही. त्या घटनेनंतरही तिच्या पतीचा मित्र सतत एसएमएस करुन फिर्यादीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करतो. फिर्यादीस फोन करुन तुझा पती तुझ्यासोबत सेक्स करु शकत नाही. तो मला तुझेसोबत सेक्स करुन तुला मुळबाळ करुन दे, असे तुझा पती सांगत असल्याचे बोलून तिचा विनयभंग करत आहे़ शेवटी या त्रासाला कंटाळून या विवाहितेने पोलिसांकडे तक्रार दिली असून सहायक पोलीस निरीक्षक तोंडे तपास करीत आहेत.