Pune Crime News | पुणे: मालक बोलत असल्याचे भासवून 40 लाखांचा गंडा, डेक्कन परिसरातील प्रकार
पुणे : Deccan Pune Crime News | कंपनीचा मालक बोलत असल्याचे भासवून कंपनीत काम करणाऱ्या व्यक्तीला ऑनलाईन पैसे पाठवण्यास भाग पाडले (Online Cheating Fraud Case). कंपनीच्या बँक खात्यातून एकूण 40 लाख 60 हजार रुपये पाठवण्यात आले. हा प्रकार 21 ऑक्टोबर 2023 रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
याबाबत आशिष राजीव बोडस (वय- 39, रा. प्रभात रस्ता) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आयपीसी 419, 420 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी आरोपींनी संगनमत करुन डेक्कन परिसरातील एका कंपनीच्या कार्य़ालयात काम करणाऱ्या आशिष बोडस यांना व्हॉट्सअॅप कॉल (WhatsApp Call) केला.
मी महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहे. कृपया व्हॉट्सअॅप मेसेज तपासा आणि सांगितल्याप्रमाणे करा, असे सांगून फोन कट केला. व्हॉट्सअॅप पाहिले असता खालील बँक खात्यावर सांगितल्याप्रमाणे 40 लाख 60 हजार 909 रुपये ट्रान्सफर करा असे सांगण्यात आले होते. फिर्यादी यांनी त्या क्रमांकावर पुन्हा फोन केला असता सायबर गुन्हेगारांनी फोन कट केला.
मीटिंगमध्ये असल्या कारणाने फोनवर बोलता येणार नाही असा मेसेज केला.
फिर्यादी यांना विश्वास बसल्याने त्यांनी पैसे ट्रान्सफर केले.
मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : व्यवस्थापकाच्या त्रासाला कंटाळून आयटी तरुणाची आत्महत्या