Pune Crime News | पुणे: दहावीत शिकणाऱ्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

Suicide

पुणे : Loni Kalbhor Pune Crime News | दहावीत शिकणाऱ्या मुलाने राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज (सोमवार) सकाळी आठच्या सुमारास उघडकीस आली. हि घटना कदमवाकवस्ती (Kadam Wak Wasti) ग्रामपंचायत हद्दीतील संभाजीनगर परिसरातील एंजल हायस्कूल शेजारी असणाऱ्या श्रीविहार वसाहतीत घडली आहे.

गोविंद सतीश रुपनवर (वय – 15 रा. संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली, मूळ रा. लातूर) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात (Loni Kalbhor Police Station) नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद रुपनवर याचे वडील चालक आहेत. घरामध्ये आई-वडील, बहिण मुलगा असे चौघेजण श्री विहार वसाहतीत राहतात. मागील एक महिन्यापूर्वीच लातूरवरुन सहकुटुंब कदमवाकवस्ती येथे राहण्यासाठी आले आहेत. तर गोविंद याने नुकताच लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीसाठी प्रवेश घेतला होता.

रविवारी गोविंद त्याची आई व बहिण सायंकाळी आठच्या सुमारास कदमवाकवस्ती परिसरात राहणाऱ्या मामाच्या घरी जेवण करण्यासाठी गेले होते. जेवण झाल्यानंतर गोविंद अभ्यास करायचा आहे असे सांगून घरी आला. त्यानंतर त्याची आई आणि बहिण पाठीमागून घरी आल्या. त्यांनी दरवाजा वाजवला. मात्र, गोविंदने आतून कोणताही प्रतिसाद दिला नाही. तो झोपल असेल असा समज त्यांना झाल्याने त्या दोघी झोपण्यासाठी गेल्या. (Pune Crime News)

आज सकाळी आईने दरवाजा वाजवला मात्र, आतून काहीच प्रतिसाद आला नाही.
त्यामुळे त्यांनी कारागिराला बोलवून दरवाजा तोडला.
त्यावेळी गोविंद याने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.
त्याला तात्काळ नागरिकांच्या मदतीने खाली उतरवून रुग्णालयात दाखल केले.
मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
यासंदर्भात लोणी काळभोर पोलिसांना माहिती देण्यात आली.
पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी करुन पंचनामा केला.
गोविंद याने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा तपास पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chinchwad Assembly Constituency | चिंचवड विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार; शत्रुघ्न काटेंचे शक्तिप्रदर्शन

Pune Monsoon Rain | पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Yerawada Jail News | येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी फरार