Pune Crime News | पुणे: महिलेवर अत्याचार करुन दागिने अन् पैसे लुबाडले, आरोपीला अटक

पुणे : Sahakar Nagar Pune Crime News | लिव-इन-रिलेशनशिप मध्ये (Live In Relationship) राहत असताना महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले. त्यानंतर कार घेण्यासाठी महिलेचे दागिने व पैसे घेऊन ते परत न करता फसवणूक केली (Cheating Fraud Case). याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police Station) एका व्यक्तीला अटक केली आहे. हा प्रकार सन 2017 ते 16 मार्च 2023 या कालावधीत धनकवडी (Dhankawadi) येथे घडला आहे.
याबाबत 36 वर्षीय महिलेने गुरुवारी (दि.11) सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश उत्तम चव्हाण Ganesh Uttam Chavan (वय-35 रा. मिरजेवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा) याच्यावर आयपीसी 376, 376/2/एन, 406, 420 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक रेश्मा साळुंखे (PSI Reshma Salunkhe) यांनी दिलेल्या माहितीनुसा, आरोपी आणि फिर्यादी लिव-इन-रिलेशनशिप मध्ये राहत होते. आरोपी मुळचा सातारा जिल्ह्यातील असून तो ड्रायव्हर आहे. तर महिला पर्स तयार करण्याचे काम करते. (Rape Case Pune)
आरोपी गणेश चव्हाण महिलेच्या घरी लिव-इन-रिलेशनशिप मध्ये राहत होता. त्याने महिलेसोबत जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर गणेश चव्हाण याने महिलेला स्वीफ्ट गाडी घेयची असल्याचे सांगून पैशांची मागणी केली. तसेच महिलेकडून साडे सहा तोळे सोन्याचे दागिने व 50 हजार रुपये घेतले.
पैसे देताना महिलेने त्याच्यासोबत करारनामा करुन घेऊन त्यावर दोन साक्षीदारांच्या सह्या घेतल्या.
मात्र, आरोपीने करारनाम्यात नमुद केलेल्या प्रमाणे पैसे व दागिने परत न करता फसवणूक केली.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली.
त्यानुसार आरोपी गणेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पुढील तपास पीएसआय रेश्मा साळुंखे करीत आहेत.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड