Pune Crime News | पुणे: ‘समोर बघून गाडी चालव’ सांगितल्याने तरुणाचा पाठलाग करुन दगडाने मारहाण, वडगाव शेरी परिसरातील घटना
पुणे : Vadgaon Sheri Pune Crime News | समोर बघून गाडी चालव असे सांगितल्याचा राग आल्याने तरुणाचा पाठलाग केला. तरुण राहत असलेल्या सोसायटीत येऊन त्याला दगडाने आणि काठीने बेदम मारहाण करुन जखमी केले. हा प्रकार मंगळवारी (दि.9) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास वडगाव शेरी येथील ब्रह्मा सनसिटी सोसायटीत (Brahma Suncity Society) घडला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerawada Police Station) चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत रजद विनोदकुमार पांडे (वय-27 रा. ब्रह्मा सनसिटी सोसायटी, वडगाव शेर, पुणे) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन आयुष कदम (वय-19), आयुष शिंदे (वय-19 रा. वडगावशेरी गावठाण, पुणे) इतर दोन साथीदारांवर भारतीय न्याय संहिता कलम 117(2), 118(1)(3)(4), 115(2), 352, 351(2)(3), 3(5) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रजत पांडे हे त्यांच्या दुचाकीवरुन घरी जात होते. त्यावेळी आरोपी समोरून दुचाकीवरुन भरधाव वेगात आले. त्यावेळी रजत यांनी समोर बघुन गाडी चालवा असे सांगितले. याचा राग आल्याने आरोपींनी थोडे पुढे जाऊन त्यांची गाडी थांबवली. रजत याच्याजवळ येऊन तुझीच चुक आहे असे म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर रजत तिथून निघाल्यानंतर आरोपींनी त्याचा पाठलाग करुन सोसायटीत आले. सोसायटीच्या आवारात आरोपींनी रजत यांना दगड व काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देऊन तिथून पसार झाले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
वाद घालून चाकूने वार
पुणे : विनाकारण वाद घालून शिवीगाळ करुन चाकूने वार करुन जखमी केल्याची घटना ताडीवाला रोड
येथे मंगळवारी (दि.9) रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान घडली आहे.
याबाबत आतिष लक्ष्मण केळकर (वय-33 रा. ताडीवाला रोड, पुणे)
यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात (Bundgarden Police Station) फिर्याद दिली आहे.
त्यावरुन अॅरन राजेश सिंधवाने (वय-19 रा. सारीपुत बुद्धविहार, ताडीवाला रोड) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Pune Crime News | पुणे : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड