Pune Crime News | पुणे: खुन्नस दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला, दहशत पसरवणाऱ्या आरोपीला अटक

marhan

पुणे : Loni Kalbhor Pune Crime News | तु आमच्याकडे खुनशी नजरेने का बघत असतो असे म्हणत चार जणांच्या टोळक्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला (Attempt To Murder). तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करुन जखमी केले. तसेच हातातील रॉड हवेत फिरवून परिसरात दहशत पसरवली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police Station) चार जणांवर गुन्हा दाखल करु एकाला अटक केली आहे. हा प्रकार रविवारी (दि.14) रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास कदमवाकवस्ती (Kadam Wak Wasti) गावच्या हद्दीतील कवडीपाट (Kawdipath) येथे घडला आहे. (Attempt To Kill)

याबाबत अमर सोमनाथ थोरात (वय-21 रा. सावली अपार्टमेंट, कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन सोमनाथ उर्फ डच्चा बबन लोंढे (रा. गुजरवस्ती, कदमवाकवस्ती, ता. हवेली) याला अटक केली आहे. तर प्रेम गायकवाड, राज पवार व त्याच्या एका साथीदारावर भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 351(2), 352, 3(5) सह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमर थोरात हे त्याच्या दुचाकीवरुन गुजरवस्ती रोडने घरी जात होते. त्यावेळी आरोपींनी रस्त्यात अडवून तु आमच्याकडे खुनशी नजरेने का बघत असतो, तुला मागच्या वेळेस सांगितलेले समजले नाही का, आम्ही इथले भाई आहोत असे म्हणून दमदाटी केली. फिर्यादी आरोपींना समजावून सांगत असताना सोमनाथ याने शिवीगाळ करुन लोखंडी रॉडने मारहाण केली.

तर इतर आरोपींनी दगडाने डोक्यात, पाठीवर मारहाण करुन जखमी केले.
त्यावेळी अमरचे मित्र त्याला सोडवण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांना देखील शिवीगाळ करुन मारण्यासाठी रॉड आणि दगड उगारले.
त्यानंतर आरोपींनी हातातील रॉड हवेत फिरवून दहशत माजवून तिथून निघून गेले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Chinchwad Assembly Constituency | चिंचवड विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढल्याने भाजपची डोकेदुखी वाढणार; शत्रुघ्न काटेंचे शक्तिप्रदर्शन

Pune Monsoon Rain | पुणे जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट; पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

Yerawada Jail News | येरवडा कारागृहातून जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी फरार

You may have missed