Pune Crime News | पुणे: बनावट टॉयलेट क्लिनर विकणाऱ्यांवर कारवाई, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त

Fake Toilet Cleaner

पुणे : Pune Crime News | बनावट हार्पिक क्लिनर, लायझॉल, कोलीन व इतर घरगुती वस्तू विकणाऱ्यांचा पुणे पोलिसांनी (Pune Police) छापा मारुन पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी समर्थ पोलिसांनी (Samarth Police Station) तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.16) नाना पेठेत (Nana Peth Pune) तीन ठिकाणी सायंकाळी आठ ते रात्री साडे अकराच्या दरम्यान करण्यात आली.

याबाबत साजीद असगर अली अन्सारी (वय-34 रा. स्पाईन रोड, भोसरी) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भरत विरा रावरीया Bharat Vira Rawaria (वय-28 रा. दत्तनगर, आंबेगाव मुळ रा. सई ता. रापर जि. कच्छ, गुजरात), हरेश परमा गामी Haresh Parma Gami (वय-38 रा.हिल विव्ह सोसायटी, आंबेगाव – Ambegaon Pune), किसन दिनेश प्रजापती Kisan Dinesh Prajapati (वय-32 रा. नागनाथ पार, सदाशिव पेठ, पुणे – Sadashiv Peth Pune) यांच्यावर कॉपीराईट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आयपी इनव्हेस्टीगेशन अँड डीटेक्टीव्ह सर्व्हीस कंपनीत रिजनल मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांच्या कंपनीला क्लारइंट कंपनीकडून डेटॉल, वीट, डुरेक्स, हार्पिक, लायझोल व कोलीन या मालाचे बनावट उत्पादन करणाऱ्या व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे अधिकार दिले आहेत.

नाना पेठेतील राजल ट्रेडींग कंपनी, गामी एंटरप्रायजेस आणि प्रिमीयम एंटरप्रायजेस याठिकाणी बनावट हार्पिक,
लायझोल, कोलीन व इतर घरगुती सामानाची विक्री होत असल्याची माहिती फिर्य़ादी यांना समजली.
त्यानंतर त्यांनी पोलीस उपायुक्तांकडे तक्रार अर्ज केला. पोलीस आयुक्तांनी समर्थ पोलिसांना कारवाईचे आदेश दिले.
समर्थ पोलिसांनी नाना पेठेतील तीन दुकानांवर छापा टाकून बनावट हार्पिक, लायझोल, कोलीन व
इतर घरगुती सामान असा एकूण 1 लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास समर्थ पोलीस करीत आहेत.

इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==

Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/

हे देखील वाचा

Pipani Symbol Freeze | निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; शरद पवार गटाला दिलासा; विरोधकांची ‘पिपाणी’ वाजणे ‘बंद’

Manorama Khedkar | मनोरमा खेडकरची पिंपरी-चिंचवड येथील कंपनी होणार जप्त; खेडकरांचा पाय आणखी खोलात

PMC Solid Waste Management | घनकचरा विभागाच्या मनमानीला वरिष्ठांचा लगाम; मर्जीतील ठेकेदार पात्र ठरणार नसल्याने घनकचरा विभागात ‘अस्वस्थता’

Pune Crime News | पुणे: घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव, तरुणाला अटक

You may have missed