Pune Crime News | पुणे: घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव, तरुणाला अटक
पुणे : Hadapsar Pune Crime News | घरात घुसून महिलेसमोर अश्लील हावभाव (Obscene Gestures) करुन असभ्य वर्तन केल्याप्ररकणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police Station) एका तरुणाला अटक केली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.17) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास हडपसर परिसरात घडला आहे. सोहेल उर्फ मोनु अन्सारी Sohail Alias Monu Ansari (वय-22 रा. वैदुवाडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत 55 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्याय संहिता कलम 74, 75,79, 332,115 (2),352,333 नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी महिला घरात बसलेल्या असताना आरोपी अचानक घरात घुसला. त्याने महिलेकडे पाहून अश्लील हातवारे केले. त्यानंतर महिलेसोबत अश्लील चाळे करुन मराहाण केली. दरम्यान महिलेचे पती त्याठिकाणी आल्याने आरोपी तिथून पळून जाऊ लागला. महिलेच्या पतीने त्याचा पाठलाग करुन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने त्यांना देखील शिवीगाळ करुन हाताने मारहाण करुन पळून गेला. याबाबत महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत. (Pune Crime News)
भररस्त्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग
कोंढवा : नर्सिंगच्या कोर्सवरुन घरी येत असताना एका अल्पवयीन मुलीला भररस्त्यात अडवून तिचा हात पकडला (Molestation Case). तिला जबरदस्तीने गाडीवर बसण्यास सांगितले. मात्र, मुलीने त्याला नकार दिला. याबाबत मुलीने आरोपीच्या आई आणि पत्नीला सांगितले. याचा राग आल्याने आरोपीने पिडित मुलीला व तिच्या आईला धमकी दिली. हा प्रकार कोंढवा परिसरात मंगळवारी (दि.15) रात्री साडेसात ते आठच्या दरम्यान घडला आहे. याबाबत 16 वर्षाच्या मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यावरुन बंटी सुधाकर रुद्राकर Bunty Sudhakar Rudrakar (वय-32 रा. काकडे वस्ती, कोंढवा) याच्यावर भान्यासं 74 सह पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.
इन्स्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा👇👇👇
https://www.instagram.com/puneriawaj?igsh=MTRpdmZqcHdqcGM1Yg==
Follow puneriawaz.co.in : https://puneriawaz.co.in/
हे देखील वाचा
Ajit Pawar On Pimpri Chinchwad Assembly | पिंपरी चिंचवडला खिंडार पडल्यानंतर अजित पवारांची
विधानसभेबाबत भविष्यवाणी, म्हणाले…